APJ Abdul Kalam (Photo Credits: Wiki Commons)

चांद्रयान 2 या इस्त्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या नियोजनानुसार आज ( 7 सप्टेंबर) मध्यरात्री 1.38 मिनिटांनी चांद्रयान 2 चे विक्रम लॅन्डर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणं अपेक्षित होते मात्र अवघ्या 2.1 किमी दुरावर असताना इस्त्रोचा विक्रम लॅन्डरशी संपर्क तुटला आहे. ही माहिती इस्त्रोच्या के सीवन यांच्याकडून देण्यात आल्यानंतर भारतीयांसह अनेक इस्त्रोच्या संशोधक आणि शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी भारतीयांसह शास्त्रज्ञांना आशा आणि प्रयत्न सोडू नका असा सल्ला दिला आहे. सध्या सोशल मीडियातही इस्त्रोच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. यामध्ये भारतीय मिसाईल मॅन अशी ओळख असलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या एका- क्लिपचाही समावेश आहे. त्यांनी 1979 सालचा त्यांचा सांगितलेला अनुभव आज इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी अनेकांची भावना आहे.सोशल मीडीयावर ISRO संशोधकांना सलाम करण्यासाठी मीम्सचा पाऊस; सामान्यांपासून दिग्गजांकडून चांद्रयान 2 मोहिमेतील प्रयत्नांचं कौतुक!

काय आहे एपीजे अब्दुल कलाम यांच्या व्हिडीओमध्ये

1979 साली एपीजे अब्दुल कलाम यांनी SLV-3 satellite launch चा किस्सा सांगितला आहे. प्रोजेक्ट डिरेक्टर म्हणून कलाम काम करत होते. यावेळेस रॉकेट लॉन्च करण्यासाठी श्रीहरिकोटा येथे काऊंटडाऊन सुरू होते. समोर कम्युटर स्क्रिनवर रॉकेट लॉन्च करू नका, तांत्रिक बिघाड आहे असा सल्ला येत होता. मात्र कलाम यांच्या मागे बसलेले 6 तज्ञ त्यांना रॉकेट लॉन्च करण्याचा सल्ला देत होते. कलाम यांनी देखील ती जबाबदारी स्विकारत रॉकेट लॉन्च केले. अपेक्षेप्रमाणे ते कामगिरी न करता बंगालच्या खाडीत पडले. या प्रकारानंतर जेव्हा मीडियाचा सामना करण्याची वेळ आली तेव्हा सतीश धवन यांनी अपयशाची जबाबदारी स्विकारत टीमवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगत मनोधैर्य वाढवलं. वर्षभरानंतर जेव्हा रॉकेट लॉन्च यशस्वी झालं तेव्हा मात्र कलाम यांना मीडियाशी सामना करण्यास पाठवलं. यावेळी तुमचा लीडर कसा आहे याची पारख होते. जेव्हा अपयश येतं तेव्हा खरा लीडर ते अपयश स्वीकारतो पण जेव्हा यश येतं तेव्हा ते टीमसोबत शेअर करायला हवं हा मोलाचा सल्ला मी शिकलो असे कलाम यांनी व्हिडिओ मध्ये म्हटले आहे.  ISRO चीफ के. सिवन यांना अश्रू अनावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिठी मारत दिला धीर (Watch Video)

मागील अनेक महिन्यांपासून इस्त्रोचे शास्त्रज्ञ अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या मेहनतीला तेव्हाच पूर्णविराम मिळेल जेव्हा ते मिशन पूर्ण करतील असा सल्ला आज नरेंद्र मोदींनीही दिला आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाण चांद्रयान 2 संपलं नसलं तरीही ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने शास्त्रज्ञ उभे राहणार आहेत.