सॅमसंग (Samsung) कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी झेड प्लीप (Samsung Galaxy Z Flip) या स्मार्टफोनच्या खरेदीवर 7 हजारांची कपात केली आहे. एवढेच नव्हेतर या स्मार्टफोनवर ग्राहकांना कंपनीकडून 8 हजार रुपयांचा अपग्रेड बोनस मिळत आहे. अपग्रेड बोनस काही निवडक स्मार्टफोन्सवर दिला जात आहे. ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करणे सोपे जावे, यासाठी गॅलेक्सी झेड फ्लिपवर आकर्षक नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला जात आहे. नो कॉस्ट ईएमआय सर्व मुख्य बँकेच्या कार्ड्सवर ऑफर केला जात आहे. या फोनला जास्तीत जास्त 18 महिन्यांच्या ईएमआयवर खरेदी करता येऊ शकते.
भारतात सॅमसंग गॅलेक्सी झेड प्लीप (8 जीबी रॅम+ 256 जीबी स्टोरेज) किंमत 1 लाख 15 हजार 999 इतकी होती. मात्र, कंपनीने या किमतीत कपात केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना हा स्मार्टफोन आता 1 लाख 8 हजार 999 रुपयात खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन अमेझॉन इंडिया, सॅमसंग इंडिया, किंवा ऑफलाईन माध्यमातून खरेदी करता येऊ शकते. हे देखील वाचा- Motorola Moto G8 Power Lite Sale Today: आज दुपारी 12 पासून फ्लिपकार्टवर सेलला सुरुवात; जाणून घ्या फिचर्स, किंमत आणि ऑफर्स
सॅमसंग गॅलेक्सी झेड प्लीपची वैशिष्ट्ये-
सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन 6.7 इंचाचा एचडीआर 10+ डायनामिक अमोल्ड फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येत असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्लस ऑक्टा - कोर प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा प्लस 12 मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 10 मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3 हजार 300 एमएएचची बॅटरी दिली आहे.
फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे, यात ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. यात एक सिम ई-सीम आहे. तर एक नॅनो सिम कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. फोन वेगवेगळ्या अँगलवर उघडता येतो. यात सेल्फी घेण्यासाठी ब्लॉगिंग करणे सोपे बनले आहे. फोनमध्ये नवीन गुगल डूओ इंटग्रेशन देण्यात आले आहे. जो व्हिडिओ चॅटिंग अनुभव अधिक सोपा आणि मस्त करण्यास मदत करतो. फोनचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हा अॅक्सिडेंटल डॅमेज केअर सोबत येतो. यात वन टाईम स्क्रीन प्रोटेक्शन आणि 24x7 डेडिकेटेड कॉल सेंटर सपोर्ट सुद्धा मिळतो. हा स्मार्टफोन मिरर गोल्ड, मिरर पर्पल आणि मिरर ब्लॅक कलर या पर्यायात उपलब्ध आहे.