सॅमसंग गॅलेक्सी Note 20 स्मार्टफोनवर मिळणार 15 हजारांपर्यंत तगडी सूट, जाणुन घ्या ऑफर्सबद्दल अधिक
Samsung (Photo Credit: Fortune)

दिग्गज टेक्नॉलॉजी कंपनी सॅमसंगने (Samsung) गेल्या महिन्यात त्यांचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy Note 20 भारतात लॉन्च केला होता. याची विक्री 28 ऑगस्ट पासून सुरु झाली होती. आता कंपनी या स्मार्टफोनवर 15 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सूट मात्र काही वेळेपुरतीच मर्यादित आहे. फोनमध्ये 120Hz चे रिफ्रेश रेट असणारा शानदार डिस्प्ले, 256 जीबी स्टोरेज, ट्रिपल रियर कॅमेरा आणि S-पेन सपोर्ट सारखे फिचर्स दिले जाणार आहेत.(Samsung Galaxy Z Fold 2 फोल्डेबल फोन 1 सप्टेंबरला होऊ शकतो लाँच, काय असतील याची खास वैशिष्ट्ये?)

सॅमसंगने त्यांचा गॅलेक्सी नोट 20 स्मार्टफोनची किंमत 77,999 रुपये आहे. तर ऑफर अंतर्गत ग्राहकांना फक्च 62,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. कंपनीने आजपासून Samsung Days सेलची सुरुवात केली असून तो 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. या वेळी गॅलेक्सी नोट 20 वर 9000 रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट व्यतिरिक्त HDFC कार्ड धारकांना 6 हजार रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक ही दिला जाणार आहे. अशा पद्धतीने युजर्सला मिळून एकूण 15 हजारांपर्यंतच्या सूटचा लाभ घेता येणार आहे.(10MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन Mi10 फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध, जाणून घ्या फिचर्स)

सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 मिस्टिक ब्लू, मिस्टिक ब्रॉन्ज आणि मिस्टिक ग्रीन रंगात उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा डायनॅमिक AMOLED फुल एचडी+डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रेज्यॉल्यूशन 2400x1080 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये 8जीबी रॅम आणि 265जीबी इंटरनल स्टोरेजसह Exynos 990 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करणार आहे.

फोटोग्राफीसाठी नोट20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेअटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात 64 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 12 मेगापिक्सलचा सेकंडरी आणि 12 मेगापिक्सलचा तिसरा सेंसर दिला जाणार आहे. सेल्फीसाठी 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये 4300mAh ची बॅटरी दिली जाणार असून ती 25 वॅटच्या सुपर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे.(भारतीयांमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारसरणीत बदल, 'या' गोष्टी पाहून Buy केला जातोय नवा मोबाईल)

काही दिवसांपूर्वी कंपनीनेआपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy M51 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन जर्मनीत लाँच केला आहे. जर्मनीच्या वेबसाइटवर हा लिस्ट करण्यात आला आहे. मात्र हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच होईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र लवकरात लवकर तो भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या स्मार्टफोनची किंमत 360 यूरो (जवळपास 31,400 रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे. जर्मनीमध्ये हा स्मार्टफोनची प्री ऑर्डर बुकिंग सुरु झाली आहे. 11 सप्टेंबरपासून या स्मार्टफोन उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.