सॅमसंगचा (Samsung) नुकताच लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी एम 12 (Samsung Galaxy M12) स्मार्टफोनला ग्राहक मोठी पसंती दर्शवत आहेत. या स्मार्टफोनची पहिली विक्री 18 मार्चला झाली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, पहिल्या सेलमध्ये 48 तासांत ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉनवर (Amazon) सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन ठरला आहे. अॅमेझॉन इंडियावर प्रत्येक तासात आपला बेस्ट सेलिंग प्रोडक्टची लिस्टला अपडेट केले आहे. कमी किंमतीत अधिक फिचर्सचा मिळत असल्याने ग्राहक या स्मार्टफोनकडे आकर्षित होताना दिसत आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या स्मार्टफोनेची सुरुवाती किंमत 11 हजार आहे. 6 हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी स्मार्टफोनची खासियत आहे. स्मार्टफोनच्या 4 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. तर, 6 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 13 हजार 499 रुपये आहे. ब्लॅक, निळा आणि हिरवा या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये स्मार्टफोन उपलब्ध आहे. आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट व डेबिट कार्डधारकांनाही फोनवरून 1 हजार रुपयांची सूट मिळत आहे. हे देखील वाचा- Realme लवकरच घेऊन येणार आणखी एक स्वस्त स्मार्टफोन C25, लॉन्चिंग डेटसह फिचर्सचा सुद्धा खुलासा
स्मार्टफोनमध्ये 6 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी 15 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरी 4 जी नेटवर्कवर 58 तासांचा टॉक टाइम प्रदान करेल, असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनमध्ये एचडी + (720x1,600 पिक्सेल) रिझोल्यूशनसह 6.5 इंचाचा इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रीफ्रेश दर 90 हर्ट्ज आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्राईड 11 आधारित वन यूआय 3.1 वर कार्य करतो.
या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. एक्झिनोस 850 प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनची स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.