Samsung Galaxy M01s (Photo Credits-YouTube)

सॅमसंग कंपनी सध्या बाजारात नवे स्मार्टफोन उतरवत आहेत. त्याचसोबत कंपनीकडून स्मार्टफोनच्या किंमतीत ही घट केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कंपनीने Samsung Galaxy A31 आणि Galaxy A51 च्या किंमती कमी केल्या होत्या. त्यानंतर आता कंपनीने दोन लो बजेच सेगमेंट मधील स्मार्टफोन Galaxy M01s आणि Galaxy M01 ची किंमत कमी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना हे दोन्ही स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तर जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमतीसह त्याच्या फिचर्सबद्दल सुद्धा.

हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या लो बजेट रेंज स्मार्टफोनमधील आहेत. तसेच जुलै महिन्यात हे स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केले होते. त्यानंतर आता याची किंमत 500 रुपयांनी कमी केली आहे. किंमतीत घट केल्यानंतर ग्राहकांना Samsung Galaxy M01s स्मार्टफोन 9,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 9,999 रुपयांना लॉन्च केला होता.(सॅमसंग गॅलेक्सी Note 20 स्मार्टफोनवर मिळणार 15 हजारांपर्यंत तगडी सूट, जाणुन घ्या ऑफर्सबद्दल अधिक)

Samsung Galaxy M01 Core बद्दल बोलायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये 1GB+16GB स्टोरेज मॉडेल 4,999 रुपये आणि 2GB+32GB स्टोरेज मॉडेल 5,999 रुपयात उपलब्ध होणार आहे. याची मूळ किंमत 5,499 रुपये आणि 5,999 रुपये आहे.या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंचाचा एचडी+ इन्फिनिटी डिस्प्ले दिला आहे. अॅन्ड्रॉइड 10 ओएस वर आधारित हा स्मार्टफोन MediaTek Helio P22 प्रोसेसरवर काम करणार आहे. यामध्ये देण्यात आलेला स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. फोनमध्ये सुरक्षिततेसाठी रियर माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. यामध्ये 13MP+2MP चा ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. तर फोनचा फ्रंट कॅमेरा 8MP चा आहे. पॉवर बॅकअपसाठी 4,000mAh बॅटरी आणि USB Type C सपोर्ट दिला आहे.(Samsung Galaxy A51, Galaxy A71 Prices Reduced: सॅमसंग गॅलेक्सी ए51, गॅलेक्सी ए71 स्मार्टफोनच्या किंमतीत घट; पहा नव्या किंमती)

सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर मध्ये 5.3 इंचाचा HD+TFT डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन 1.5GHz MediaTek 6739 प्रोसेसर लेस आहे. स्मार्टफोन Android Go प्लॅटफॉर्मवर काम करणार असून यामध्ये पॉवर बॅकअपसाठी 3,000mAh ची बॅटरी दिली आहे. यामध्ये एलईडी फ्लॅशसह 8MP रियर कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला सेल्फीसाठी 5MP कॅमेरा दिला आहे.