Samsung Galaxy A51, Galaxy A71 (Photo Credits: Amazon India)

सॅमसंग गॅलेक्सी एम 51 (Samsung Galaxy M51) स्मार्टफोन भारतात लॉन्च केल्यानंतर साऊथ कोरियन कंपनीने गॅलेक्सी ए51 (Galaxy A51) आणि गॅलेक्सी ए71 (Galaxy A71) हँडसेटची किंमत कमी केली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 'A' सिरीजमधील असून सर्वाधिक विक्री होणारे हँडसेट्स आहेत. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोनची किंमत 2000 रुपयांनी कमी केली आहे. काल गॅलेक्सी ए51 (Galaxy M51) च्या लॉन्चिंगनंतर या स्मार्टफोनच्या किंमतीत घट करण्यात आली. (सॅमसंग गॅलेक्सी एम51 स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स, किंमत आणि ऑनलाईन सेलची तारीख)

नव्या किंमतीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी ए51 ची किंमत 23,999 रुपये आहे. पूर्वी या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 25,999 रुपये होती. तर गॅलेक्सी ए71 ची किंमत आता 30,000 रुपये आहे. सर्व ऑनलाईन माध्यमातही हे स्मार्टफोन्स नव्या किंमतीत उपलब्ध झाले आहेत.

Samsung Galaxy A51 (Photo Credits: Amazon India)

सॅमसंग गॅलेक्सी ए51 स्पेसिफिकेशन्स:

प्रोसेसर Exynos 9611
रॅम 6GB / 8GB
इंटरनल स्टोरेज (मेमरी) 128GB
बॅटरी 4,000mAh
बॅक कॅमेरा 48MP, 12MP, 5MP, 5MP
सेल्फी कॅमेरा 32MP
फास्ट चार्जिंग सपोर्ट 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट

Samsung Galaxy A71 (Photo Credits: Amazon India)

सॅमसंग गॅलेक्सी ए71 स्पेसिफिकेशन्स:

प्रोसेसर Snapdragon 730
रॅम 6GB / 8GB
इंटरनल स्टोरेज (मेमरी) 128GB
बॅटरी 4,500mAh
बॅक कॅमेरा 64MP, 12MP, 5MP, 5MP
सेल्फी कॅमेरा 32MP
फास्ट चार्जिंग सपोर्ट 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट

साऊथ कोरियन कंपनी सॅमसंगने या मोबाईलच्या किंमत कमी करण्यामागे कोणतेही कारण किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही. रिपोर्टनुसार, कंपनी या मोबाईलच्या S अपग्रेड्सवर काम करत आहे आणि ते काही महिन्यातच लॉन्च होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सॅमसंगने गॅलेक्सी एम 51 हा आकर्षक स्मार्टफोन केवळ 24,999 रुपयांत लॉन्च केला आहे.



Samsung Galaxy A51 (Photo Credits: Amazon India)

सॅमसंग गॅलेक्सी ए51 मध्ये Exynos 9611 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. तर गॅलेक्सी एम51 मध्ये Snapdragon 730G हा प्रोसेसर आहे. गॅलेक्सी ए51 मध्ये  4500mAh ची बॅटरी दिलेली असून 25W चा फास्ट चार्जिंग सपोर्टही आहे. गॅलेक्सी एम51 मध्ये 7000 mAh ची बॅटरी आणि 25W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.