सॅमसंग गॅलेक्सी एम42 ची लॉन्चिंगची प्रतिक्षा संपणार आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च केला जाणार असून तारखेबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. गॅलेक्सी एम42 5जी वायफाय आणि ब्लुटूथ वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे. यापूर्वी हा फोन BIS सर्टिफिकेशन साइटवर स्पॉट केला गेला होता. सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी स्मार्टफोन गॅलेक्सी A42 5G चा रीब्रँन्ड वर्जन असू शकतो. तर गॅलेक्सी एम सीरिज मधील पहिलाच 5G स्मार्टफोन असणार आहे.(Flipkart वर 16 मार्चपासून Electronics Sale; स्मार्टफोन, लॅपटॉप, फ्रीजसह अन्य अॅक्सेसरीजवर मिळवा जबरदस्त डिस्काउंट)
या फोनमध्ये युजर्सला 6000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. तसेच मॉडेल नंबर SM-M426B सह लिस्ट केला गेला आहे. फोनमध्ये ड्युअल बँन्ड वायफाय सपोर्ट मिळणार आहे. हा एक अॅन्ड्रॉइड 11 बेस्ड स्मार्टफोन असणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम42 स्मार्टफोन ब्लुटूथ SIG वर स्पॉट केला गेला आहे. यापूर्वी फोन 3C सर्टिफिकेशन्स बेवसाइटवर स्पॉट करण्यात आला होता. जर फोटोग्राफी बद्दल बोलायचे झाल्यास, सॅमसंग गॅलेक्सी एम42 मध्ये रियरमध्ये एक 64MP चा प्रायमरी मिळणार आहे. फोनच्या फ्रंटला सिंगल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. तर 128GB चे इन बिल्ट स्टोरेज दिला गेला आहे. फोन अॅन्ड्रॉइड 11 बेस्ड आउट ऑफ द बॉक्स वर काम करणार आहे.(Xiaomi Mi 10S स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)
गेल्या वर्षात 2020 मध्ये सॅमसंगने गॅलेक्सी ए42 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 750G चिपसेटसह येणार आहे. यामध्ये 8GB रॅम सुद्धा दिला गेला आहे. स्मार्टफोनसाठी 6.6 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्लेसह येणार आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. जी 15W फास्ट चार्जरच्या मदतीने लगेच चार्ज होणार आहे. फोनच्या रियर पॅनलमध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे. तर एक 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5MP डेप्थ सेंसर आणि एक 5MP चा मॅक्रो लेन्स दिला गेला आहे.