Flipkart वर 16 मार्चपासून Electronics Sale; स्मार्टफोन, लॅपटॉप, फ्रीजसह अन्य अॅक्सेसरीजवर मिळवा जबरदस्त डिस्काउंट
Flipkart | Representational Image | (Photo Credit: Official)

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू (Electronics And Equipment) खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या लोकांसाठी आनंदाची माहिती समोर येते आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) येत्या 16 मार्चपासून इलेक्ट्रॉनिक्स सेल (Electronics Sale) सुरु होणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, फ्रीजसह अन्य अॅक्सेसरीजवर मोठी सूट मिळणार आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय, कंम्प्लिट मोबाइल प्रोटेक्शन आणि एक्सचेंज ऑफर दिली जाणार आहे. एवढेच नव्हेतर, एचडीएफडी बॅंकेच्या खातेदारांना क्रेडिट कार्ड्स किंवा ईएएमआयवर 10 टक्के इंस्टेन्ट डिस्काऊंट देण्यात येणार आहे.

फ्लिपकार्टचा इलेक्ट्रॉनिक्स सेल 16 मार्च ते 20 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर ८० टक्के सूट दिली जाणार आहे. याशिवाय, बेस्ट सेलिंग लॅपटॉपवर 40 टक्के, स्मार्ट व्हियरेलबल्सवर 50 टक्के, टीव्ही 75 टक्के, बिग स्क्रीन टेलिव्हिजनवर 65 टक्के सूट देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Flipkart Smartphone Carnival Sale: फ्लिपकार्ट सेलचा आज शेवटचा दिवस, Realme 7 Pro वर मिळत आहे जबरदस्त सूट; जाणून घ्या नवीन किंमत आणि ऑफर्स

या सेलमध्ये रिअलमी, पोको, सॅमसंग, नार्झो कंपनीच्या स्मार्टफोनवरही मोठ सूट देण्यात आली आहे. यापैकी स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना या सेलचा फायदा होऊ शकतो. यादरम्यान 3 कोटीहून जास्त प्रोडक्ट्सवर दररोज डिल्स केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मार्च महिन्यानंतर कडक उन्हाला सुरुवात होते. परिणामी, वातनुकूलीत वस्तूंच्या किमतीत वाढ होते. यामुळे फ्लिपकार्ट सेलच्या अंतर्गत पंखा, फ्रीज, कुलर, कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत.