Samsung Galaxy E02 स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च, युजर्सला मिळणार धमाकेदार फिचर्स
Samsung (Photo Credit: Fortune)

सॅमसंग कंपनी आपली नवी Galaxy E सीरिज अंतर्गत एक नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. त्यानुसार, लो अॅन्ड आणि मिड-रेंज स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर सॅमसंगच्या सपोर्ट पेजवर अपकमिंग स्मार्टफोन लाइव्ह करण्यात आला आहे. फोन सपोर्ट पेजवर मॉडेल क्रमांक sm-e025F/DS सह लिस्ट केला जाणार आहे. त्याचसोबत डिवाइस ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड सर्टिफिकेशन साइटवर गेल्या महिन्यात लिस्ट करण्यात आला होता. फोन ड्युअल सिम कनेक्टिव्हिटीसह येणार आहे.

GIzChina च्या रिपोर्टसनुसार, फोन सिंगल बँन्ड सपोर्टसग येणार आहे. फोनमध्ये अॅन्ड्रॉइड 10 बेस्ड असणार असून लवकरच अॅन्ड्रॉइड11 चे अपडेट दिले जाणार आहे. Samsung कडून साधारण लो अॅन्ड स्मार्टफोनमध्ये अॅन्ड्रॉइड 10 Go स्पोर्ट दिला जातो. Samsung Galaxy E2 स्मार्टफोन Galaxy M सीरिजच्या स्मार्टफोनच्या किंमतीत येणार आहे. Samsung Galaxy E02 स्मार्टफोनला 10 हजार रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. पण अद्याप फोनचा डिझाइन, स्पेसिफिकेशन बद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र अपेक्षा आहे की फोनमध्ये 6 इंचाची स्क्रिन दिली जाऊ शकते. त्याचसोबत फोन 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज ऑप्शनमध्ये येणार आहे. फोनच्या रियर पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.(Samsung Galaxy M62 स्मार्टफोन येत्या 3 मार्चला होणार लॉन्च, युजर्सला मिळणार धमाकेदार फिचर्स) 

सॅमसंग गॅलेक्सी ई02 सह मार्च महिन्यात कंपनी काही अन्य स्मार्टफोन सुद्धा लॉन्च करु शकते. यामध्ये Galaxy A32 4G मॉडेल, Galaxy A52 आणि Galaxy A72 चा समावेश आहे. तर गॅलेक्सी ए32 स्मार्टफोन मायक्रोसाइटवर लिस्ट करण्यात आला आहेय त्यामुळे तो 5 मार्चला लॉन्च केला जाऊ शकतो.