Samsung Galaxy M62 संबंधित गेल्या काही दिवसांपासून गोष्टी लीक होत आहेत. अशातच आता समोर आलेल्या नव्या रिपोर्टनुसार, स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख समोर आली आहे. हा स्मार्टफोन गेल्या दिवसात भारतात लॉन्च झालेल्या गॅलेक्सी एफ62 चे रिब्रँडेड वर्जन असू शकते. यामध्ये खास फिचर्स म्हणजे 7000mAh ची बॅटर, क्वाड, रियर कॅमेरा सेटअप आणि पॉवरफुल परफॉर्मेन्सची क्षमता दिली जाऊ शकते.(Motorola कंपनीचा 5000mAh बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Moto E7 Power भारतात लाँच, काय आहे किंमत?)
सॅमसंग गॅलेक्सी एम62 संबंधित मलेशियातील वेबसाइट Lazada वर एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन येत्या 3 मार्चला मलेशियात लॉन्च केला जाणार आहे. पोस्टमध्ये दिली गेलेली इमेज ही भारतात लॉन्च झालेल्या Galaxy F62 सारखाच आहे. स्मार्टफोन ब्लू आणि ग्रे रंगाच्या दोन वेरियंटमध्ये शो करण्यात आला आहे. ज्यामुळे स्पष्ट होते की, Galaxy M62 दोन कलर ऑप्शनध्ये लॉन्च होणार आहे.(स्मार्टफोन युजर्ससाठी महत्वाची बातमी! तुमच्याकडे 'हे' App असल्यास तातडीने करा डिलीट अन्यथा फोन होईल हॅक)
कंपनीचा हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेल्या Galaxy F62 चा रिब्रँन्ड वर्जन असणार आहे. यामध्ये एकसमान फिचर्स मिळू शकतात. तसेच स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येणार आहे. तसेच एक्सनोस 9825 प्रोसेसरवर फोन काम करणार आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7000mAh ची पॉवरफुल बॅटरी मिळणार आहे. या व्यतिरिक्त फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. फोनचा प्रायमरी सेंसर 64MP चा असणार आहे. यामध्ये 12MP चा वाइड अँगल लेन्स ही दिली जाणार आहे. तसेच 5MP चा डेप्थ सेंसर आणि 5MP चा मॅक्रो सेंसर सुद्धा दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी युजर्सला 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.