सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतोच असतो. तर विविध कामे झटापट होण्यासाठी स्मार्टफोन काही अॅप्स उपलब्ध असतात. तसेच गुगल प्ले स्टोअर वर सुद्धा तुम्हाला जे काम आहे त्या कामाचे बहुतांश वेळा अॅप सर्च केल्यास मिळते. परंतु एखादा अॅप डाऊनलोड करताना त्या संबंधित माहिती तुम्ही वाचून पाहता का? असे नसेल तर काही वेळेस फेक अॅपच्या माध्यमतून तुमची फसवणूक केली जाऊ शकते किंवा तुमची खासगी माहिती सुद्धा लीक होऊ शकते. त्यामुळे एखादा अॅप डाऊनलोड करताना सावध रहा.
गुगल प्ले स्टोअर वरील ShareIt या अॅपमध्ये काही त्रुटी असल्याचे Trend Micro यांनी शोधून काढले आहे. त्यानुसार या अॅपच्या माध्यमातून तुमचा स्मार्टफोन हॅक केला जाऊ शकतो. त्यामुळे या सिक्युरिटी फर्मकडून याबद्दल युजर्सला सुचना दिली असून हे अॅप शेअर करणे बंद करावे असे सांगण्यात आले आहे. तर ShareIt सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या अॅप पैकी एक आहे. सध्या भारतात शेअरइट या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. या अॅपमधून डेटा लीक होण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती गुगलने दिली आहे.(Bumble डेटिंग अॅपची सीईओ Whitney Wolfe बनली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश महिला; Tinder शी झालेल्या वादानंतर उभी केली स्वत: ची कंपनी)
Trend Micro ने असे म्हटले आहे की, ShareIt ला या प्रकरणी सुचना सुद्धा दिली गेली आहे. पण अद्याप या कंपनीने त्यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. या रिपोर्टचा खुलासा रिसर्चच्या तीन महिन्यानंतर करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर शेअरइट वापरत असाल ते डिलिट करा.