Reliance Jio 5G: दिवाळी यंदा अधिक वेगवान, रिलायन्स जिओ 5G सेवा होणार लॉन्च; मुकेश अंबानी यांची घोषणा
Reliance Jio 5G Service | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

इंटरनेट (Internet) विश्वातील सर्वात वेगवान समजली जाणारी 5G सेवा (Reliance Jio 5G) आता येत्या दिवळीपासून भारतात लॉन्च (Reliance Jio 5G Service by Diwali) होत आहे. रिलायन्स जिओ ही सेवा घेऊन येत आहे. रिलायन्स समूहाचे (Reliance Industries) चेअरमन आणि मुख्य निदेशक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आज (29 ऑगस्ट) ही घोषणा केली. रिलायन्स समूहाची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या बैठकीवेळी मुकेश अंबानी बोलत होते. या वेळी त्यांनी इतरही अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान, रिलायन्स रिटेलने 2 लाख कोटी रुपयांची उलाढाल आणि 12,000 कोटी रुपयांचा EBITDA मिळवला आहे. आज रिलायन्स रिटेल, आशियातील टॉप-10 रिटेलर्समध्ये आहे, असे सांगायलाही मुकेश अंबानी विसरले नाहीत.

येत्या दिवळीपासून मिळणार रिलायन्स जिओ 5G सेवा

रिलायन्स जिओ 5G सेवेबाबत विस्ताराने बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, आम्ही (रिलायन्स जिओ) जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट योजना तयार केली आहे. ही योजना आम्ही दिवाळी 2022 पर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकातासह देशातील इतरही अनेक प्रमुख शहरांमध्ये सुरु करु. (हेही वाचा, Reliance AGM 2022: मुकेश अंबानी यांच्याकडून 5G इंटरनेट सेवा, आयपीओबाबत आज मोठ्या घोषणेची शक्यता)

ट्विट

भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेसाठी कटीबद्ध

जिओ 5G सेवा उच्च तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि वेग यांनी युक्त असेल. शिवाय ती प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकाला परवडेल अशा किफायत दरात उपलब्ध करुन द्यायचा आमचा विचार आहे. महत्त्वाचे म्हणजे या सेवेद्वारे आम्ही भारताला अमेरिका आणि चिनपेक्षाही अधिक वेगवान अर्थव्यवस्था बनविण्यासाठी वचनबद्ध आहोत, असेही मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितले.

ट्विट

5G सेवेसाठी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक- आकाश अंबानी

दरम्यान, रिलायन्स जिओचे नवनिर्वाचीत अध्यक्ष आकाश आंबांनी म्हणाले, जीओ Jio 'स्टँडअलोन 5G' नावाची 5G ची नवीन आवृत्ती तैनात करेल. संपूर्ण भारतात हे नेटवर्क तैनात करण्यासाठी जिओ 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असे ते म्हणाले.