Mukesh Ambani | (File Image)

रिलायन्स इंडस्ट्रीजची 45 वी वार्षिक बैठक (Reliance AGM 2022) आज (सोमवार, 29 ऑगस्ट) दुपारी 2 वाजता अभासी म्हणजेच व्हर्च्युअल रियालिटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पार पडेल. आजच्या बैठकीत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) बऱ्याच घोषणा करण्याची शक्यता आहे. व्हर्च्युअल माध्यमातून आपली वार्षिक बैठक आयोजित करणारी रिलायन्स ही जगातील पहिलीच कंपनी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीचे अधिकृत प्रसारण JioMeet शिवाय पाच प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी दोन वाजलेपालून यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इतर ठिकाणीही बैठकीचा वृत्तांत दिला जाईल.

रियान्सने आपल्या 45 व्या एजीएमसाठी एक व्हॉट्सअॅप क्रमांकही जारी केला आहे. आपण '7977111111' या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एजीएमची तारीख आणि वेळ पाहू शकता. तसेच या बैठकीचे अपडेट्सही जाणून घेऊ शकता. दरम्यान, शेअरधारक या बैठकीत कसे मतदान करतो आणि त्याबाबत माहिती कशी घेता येईल, याबाबतही आपण माहिती घेता येईल. (हेही वाचा, Mukesh Ambani Buys Villa in Dubai: मुकेश अंबानी यांनी दुबईत खरेदी केले आलिशान घर; किंमत ऐकून उडेल तुमची झोप)

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने आपल्या दोन संस्थांना रियान्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या डीमर्जर अथवा आयपीओ संदर्भात घोषणा करण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. आरआयएलच्या रिटेल आणि टेलीकम्यूनिकेशन व्यवहारासंदर्भात आयपीओबद्दलही जोरदार चर्चा आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रियालन्स समूहाचे चेअरमन आणि मुख्य निदेशक मुकेश अंबानी सोमवारी होणाऱ्या 45 व्या वार्षीक सर्वसाधाण सभेत शेअरधारकांना मार्गदर्शन करतील. या सर्वसाधारण सभेचे डिजिटल माध्यमातून प्रसारण होईल.

दरम्यान, मुकेश अंबानी आजच्या सर्वसाधारण सभेत इटरनेटच्या 5G तंत्रज्ञानाबाबतही घोषणा करण्याची शक्यता आहे. सांगितले जात आहे की, रिलायन्स आगामी काळात ग्रीन एनर्जीवर अधिक लक्ष्य केंद्रीत करण्याची शक्यता आहे. अंबानी यांनी पाठिमागील वर्षी सोलर मॉड्युल्स, हायड्रोजन इलेक्ट्रोलायजर्स, फ्यूल सेल्स आणि स्टोरेज बॅटरी तयार करण्यासाठी 4 गीगा-फॅक्टरीज तयार करण्याबाबत घोषणा केली होती. त्यामुळे यंदाच्या सभेत यावर अधिक प्रकाश टाकण्यात येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.