
रिलायन्स जिओने (Reliance Jio) त्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन बंद केले आहेत. जे रिचार्ज प्लॅन बंद केले आहे ते JioPhone युजर्ससाठी होते. यामध्ये 49 आणि 69 रुपयांचा जिओचा शॉर्ट टर्म प्लॅन ऑफर केला जात होता. जिओने हे दोन्ही प्लॅन याच वर्षात फेब्रुवारी महिन्यात लॉन्च केला होता. त्यानुसार ग्राहकांना 14 दिवसांची वॅलिडिटी दिली जात होती. हे प्लॅन जिओच्या वेबसाईटवर विविध कॅटेगरी अंतर्गत लिस्ट करण्यात आले होते. सध्या हे रिचार्ज प्लॅन दोन कॅटेगरी म्हणजेच Jio all in one plan आणि JioPhone 153 मध्ये विभक्त करण्यात आले आहेत.
जिओचे हे दोन्ही प्लॅन बंद झाल्यानंतर जिओचा सर्वात स्वत प्लॅन 75 रुपयांचा झाला आहे. ज्यानुसार ग्राहकांना 28 दिवसांची वॅलिडिटी मिळणार असून 30GB डेटा ऑफर केला जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त 50SMS सुद्धा पाठवता येणार आहेत. जिओ टू जिओ कॉलिंग फ्री मिळणार असून अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिट्स मिळणार आहेत.(एअरटेलने सादर केली BlueJeans नावाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा; JioMeet, Zoom शी होणार टक्कर)
जिओच्या 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वॅलिडिटी आणि 7GB डेटासह 25 फ्री SMS पाठवता येतात. तसेच युजर्सला अन्य टेलिकॉम नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 250 मिनिट्स दिले जातात. जिओ टू जिओ कॉलिंग पूर्णपणे फ्री असून यामध्ये कॉम्पलिमेंट्री अंतर्गत जिओ अॅप सुद्धा ऑफर केले जातात.(Netflix कडून सुपर ऑफर! 'The Old Guard' गेम जिंकल्यावर 83 वर्षांसाठी फ्री सब्सक्रिप्शन)
कंपनीच्या 40 रुपयांच्या जिओ प्लॅनची सुद्धा वॅलिडिटी 14 दिवसांची आहे. यामध्ये 2GB डेटा आणि अन्य बेनिफिट्स 49 रुपयांच्या रिचार्ज प्रमाणे दिले जातात. तसेच युजर्सला 25 फ्री SMS पाठवता येतात. तसेच अन्य टेलिकॉम नेटवर्कवर कॉलिंगसाठोी 250 मिनिट्स दिले जाणार आहेत. जिओ टू जिओसाठी मात्र फ्री कॉलिंगची सुविधा आहे.