रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. हा प्लॅन अवघ्या 1 रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. हा प्लॅन फक्त My Jio अॅपवर सूचीबद्ध करण्यात आला असून, तो वेब सर्चवर दिसणार नाही. जिओने खासकरून कमी डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक रुपयाचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. आता तुम्ही फक्त 1 रुपयात 30 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज करू शकता. कंपनीच्या या ऑफरमध्ये तुम्हाला फ्री डेटाची सुविधा मिळणार आहे.
जिओच्या एक रुपयाच्या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये एकूण 30 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. Jio कडून ग्राहकांना एक रुपयाच्या प्लॅनमध्ये 100 MB हायस्पीड डेटा दिला जात आहे. जेव्हा या प्लॅनची 100 MB डेटा मर्यादा संपेल, तेव्हा इंटरनेटचा स्पीड 60 kbps पर्यंत घसरेल. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा दिलेली नाही. अशा परिस्थितीत कोणताही सिम सक्रिय ठेवण्यासाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरू शकतो.
सध्या जिओचा एक रुपयाचा प्लॅन हा भारतातील सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन बनला आहे. भारतात गरीब लोकांची मोठी लोकसंख्या आहे. अशा लोकांचा इंटरनेटचा वापर अतिशय मर्यादित आहे. याच गरजू ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन जिओने 1 रुपये किमतीचा डेटा प्लॅन आणला आहे. Jio च्या Rs 1 च्या प्लान व्यतिरिक्त, स्वस्त प्लानमध्ये टॉप-अप प्लॅन Rs 10 आणि Rs 20 चा समावेश आहे. 10 रुपयांच्या प्लॅनमध्ये, 7.47 रुपयांचा टॉक-टाइम अमर्यादित वैधतेसह उपलब्ध आहे. तर 20 रुपयांच्या प्लॅनमध्ये, 14.95 रुपयांचा टॉकटाइम अमर्यादित वैधतेसह उपलब्ध आहे. (हेही वाचा: New SIM Rules: तुम्ही किती सिम कार्ड वापरता? मोबाईल नंबर बंद होण्यापूर्वीच जाणून घ्या हा नियम)
दरम्यान, रिलायन्स जिओने नुकतेच आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. जिओचे नवीन टॅरिफ प्लॅन 1 डिसेंबर 2021 पासून देशभर लागू झाले आहेत. यामध्ये डेटा प्लॅन, अमर्यादित प्लॅन तसेच जिओफोन प्लॅनचा समावेश आहे. याआधी एअरटेल आणि Vi ने टॅरिफ प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. जिओने आपल्या प्लॅनच्या किमतीत सुमारे 20 ते 25 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे.