New SIM Rules: तुम्ही किती सिम कार्ड वापरता? मोबाईल नंबर बंद होण्यापूर्वीच जाणून घ्या हा नियम
TRAI New SIM Rules | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

स्मार्टफोनने (Smartphone) क्रांती केल्यापासून अपवाद वगळता आजकाल सर्वांकडेच दोन सिम कार्ड (New SIM Rules) पाहायला मिळतात. पण, सर्वसामान्य व्यक्ती आपल्याकडे किती सिमकार्ड ठेऊ शकतो याबाबत तुम्हाला माहिती आहे का? टेलीकॉम ग्राहक एकाच वेळी स्वत:कडे नऊ सिम कार्ड ठेऊ शकतो. भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India) म्हणजेच ट्राय (TRAI) ने याबाबत एक नवा नियम नुकताच जारी केला आहे. या नियमानुसार कोणीही एक ग्राहक एकाच वेळी 18 सिमकार्ड घेऊ शकतो. दरम्यन, ट्रायचा नियम (TRAI Guidelines) आहे की, संबंधित व्यक्ती आपल्याकडील सर्व सिम कार्ड एकाच ऑपरेटरकडून घेतलेली नसावीत. मात्र, आपण नऊ पेक्षा अधिक सिमकार्ड ठेऊ शकता. मात्र, ही सर्व सिमकार्ड आपल्याला व्हेरिफाय (पडताळणी) करुन घ्यावी लागतील अन्यथा आपला मोबाईल क्रमांक बंद होऊ शकतो.

टायने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, नऊ पेक्षा अधिक सिम कार्ड बाळगणाऱ्या ग्राककांनी त्यांची सिम कार्ड पुन्हा एकदा पडताळणी करुन घ्यावीत. जी सिम कार्ड पडताळणी केलेली नसतील ती सिम कार्ड बंद करण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत. जम्मू-कश्मीर आणि असमसह पूर्वेकडील राज्यांसाठी ही सीमा सहा सिमकार्ड इतकी आहे. दुरसंचार विभागाने जारी केलेल्या आदेशनुसार, ग्राक अनुमती घेऊन अधिक सिम कार्ड सोबत बाळगू शकतो. त्याने पूर्वपरवानगी घेतली असेल तर आपल्या मर्जीने सिम कार्ड सुरु आणि बंद करण्याचा पर्याय त्याला दिला जाऊ शकतो. अधिक माहिती देताना विभागाने म्हटले आहे की, जर एखाद्या ग्राहकाडे सर्व दूरसंचार सेवा प्रदाता कंपनीचे सिमकार्ड निर्धारीत संख्येपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले तर सर्व सिमकार्डची पुन्हा एकदा सत्यपडताळणी केली जाईल. (सिम कार्ड नियमामाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी हेही वाचा, सरकारकडून Sim Card वापरण्यासंबंधित नियमात बदल, जाणून घ्या अधिक)

ट्रायने हा नियम प्रामुख्याने आर्थिक गुन्हे, आपत्तीजनक फोन कॉल, स्वयंचलित कॉल आणि फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर पुढे आल्यांनंतर त्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता अधिक सिम कार्ड बाळगणाऱ्या व्यक्तींच्या सिम कार्डची पडताळणी केली जाईल.तसेज, जे ग्राहक नियमांचे उल्लंघन करतील त्या सर्वांचे फोन क्रमांक डेटाबेसमधून हटविण्यात यावेत असेही आदेश ट्रायने दिले आहेत.