Reliance Jio च्या 'या' प्लॅनमध्ये मिळेल 240 GB डेटा सह इतर सुविधा
Reliance Jio (Photo Credit: LinkedIn)

वर्क फ्रॉम होमच्या (Work From Home) सध्याच्या काळात दिवसाला मिळेल तितका डेटा (Data) कमी पडत असतो. ऑफिसचे काम, व्हिडिओ, सिनेमे पाहणे, व्हिडिओ कॉलिंग या डेटा कधी संपतो कळतही नाही. अशातच टेलिकॉम कंपन्यांनी डेली अनलिमिडेट डेटा सह खास प्लॅन्स युजर्ससाठी सादर करण्यात आले आहेत. तुम्हाला जर अधिक डेटाची गरज असले तर कॉलिंग सह येणारा डेटा प्लॅन ऐवजी दोन वेगवेगळे प्लॅन्स तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुम्हाला गरजेनुसार डेटा वापरता येईल त्याचबरोबर अधिक महागडा डेटा प्लॅन घेण्याची गरज भासणार नाही. (Reliance Jio युजर्ससाठी खुशखबर; रिचार्जवर मिळणार 1000 रुपयांची बक्षीसं)

युजर्संना खूश करण्यासाठी नेहमीप्रमाणे जिओकडून नवा 1208 रुपयांचा एक वर्क फ्रॉम होम प्लॅन सादर करण्यात आला आहे. ज्यात अनलिमिटेड डेटा मिळत आहे. जाणून घेऊया या प्लॅनबद्दल सविस्तर....

रिलायन्स जिओच्या 1208 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 240 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनची व्हॅलिटीडी 240 दिवसांची म्हणजेच सुमारे 8 महिन्यांची आहे. युजर्स 30 दिवसांमध्ये 30 जीबी डेटा वापरु शकतात. यात 30 जीबी डेटा संपल्यानंतर त्याचा स्पीड 64Kbps इतका होईल. (Reliance Jio चा नवा प्रीपेड प्लॅन; 125 रुपयांत महिनाभर मिळवा अनलिमिटेड कॉल सह हाय-स्पीड डेटा)

हा वर्क फ्रॉम होम प्लॅन असल्याने यात तुम्हाला कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा देण्यात आलेली नाही. मात्र Jio Apps फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. तर 3999 रुपयांच्या डेटामध्ये Disney+ Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन वर्षभरासाठी दिले जाईल.