Reliance Jio चा नवा प्रीपेड प्लॅन; 125 रुपयांत महिनाभर मिळवा अनलिमिटेड कॉल सह हाय-स्पीड डेटा
Reliance Jio (Photo Credits: LinkedIn)

रिलायन्स जिओने (Reliance Jio) एक नवा प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) सादर केला आहे. हा प्लॅन स्वस्त असून यात अनलिमिटेड कॉल आणि हाय-स्पीड डेटा यांसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. 150 रुपयांपेक्षा स्वस्त असलेले कंपनीचा प्लॅन म्हणजे 125 रुपयांचा. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असून यात 0.5 जीबी डेटा प्रत्येक दिवशी दिला जाईल. म्हणजे एकूण 14 जीबी डेटा युजर्संना मिळेल. प्रत्येक दिवशी मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps इतका होईल. (Reliance Jio युजर्ससाठी खुशखबर; रिचार्जवर मिळणार 1000 रुपयांची बक्षीसं)

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिडेट व्हाईस कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. याशिवाय एकूण 300 एसएमएस देखील दिले जातील. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील फ्री देण्यात येणार आहे. म्हणजेच युजर्संना जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ म्युझिक यांच्यासमवेत अन्य जिओ अॅप्स कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता अॅक्सिस करता येईल. (Jio All In One Plans: जिओचे ऑल इन वन प्लॅन्स सादर; पहा काय आहेत ऑफर्स)

याशिवाय कंपनीने 185 रुपये, 155 रुपये आणि 75 रुपयांचे देखील प्रीपेड प्लॅन्स आहेत. या सर्व प्लॅन्सची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. तसंच यात अनलिमिटेड कॉल्सची सुविधा देखील देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व प्लॅन्स जिओफोनमध्ये जिओसीम असतानाच काम करतील.

युजर्सच्या सोयीसाठी आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओ सातत्याने नवनवे प्लॅन्स सादर करत असतं. तसंच कॅशबॅक, रिव्हार्ड्स देऊनही ग्राहकांना धरुन ठेवण्याची किमया जिओने साधली आहे.