रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने गेल्या वर्षात त्यांच्या सर्व टॉकटाइम प्लॅनसाठी IUC टॉपअप मध्ये कनवर्ट केले होते. आययुसी अशा युजर्ससाठी लागू करण्यात आले होते जे नॉन जिओ युजर्स आहेत. म्हणजेच जिओवरुन एखाद्या दुसऱ्या कंपनीच्या युजर्सला फोन करायचा झाल्यास त्यांना आययुसी अंतर्गत चार्ज स्विकारला जात आहे. मात्र कंपनी आता जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग फ्री सुविधा त्यांच्या ग्राहकांना देऊ करत आहे. रिलायान्स जिओ युजर्सला 6 IUC टॉपअप वाउचर ऑफर करत आहे. हे वाउचर 10 रुपयांपासून ग्राहकांना खरेदी करता येणार असून कमीतकमी 1 हजार रुपयापर्यंत येणार आहेत. यामध्ये IUC टॉपअप वाउचर मध्ये 14 हजार पेक्षा अधिक कॉलिंगसाठी मिनिटे ऑफर करत आहे. त्याचसोबत 100GB पर्यंत डेटा सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे.
ग्राहकांना 10 रुपयांच्या आययुसी टॉपअप मध्ये 1 जीबी 4G डेटासोबत 7.47 रुपयांचा टॉक टाइम आणि 124 आययुसी मिनिटे ऑफर केली जाणार आहेत. आययुसी मिनिटांचा उपयोग हा अन्य कंपनींच्या नेटवर्कसोबत संपर्क साधण्यासाठी केला जातो. जिओच्या काही प्रिपेड प्लॅन्समध्ये कोणतेही आययुसी मिनिट दिली जात नाही आहेत. अशातच नॉन-जिओ क्रमांकांवर फोन करायचा असल्यास 10 रुपयांचा आययुसी टॉपअप तुम्हाला खरेदी करता येणार आहे. तर जिओच्या 20 रुपयांच्या आययुसी टॉपअप मध्ये 2जीबी 4G डेटासह 14.95 रुपयांचा टॉकटाइम आणि 249 रुपयांचे आययुसी मिनिटे दिली जाणार आहेत.(Vodafone कंपनीची धमाकेदार ऑफर, स्वस्त रिचार्जमध्ये युजर्सला मिळणार 3GB डेटासह फ्री कॉलिंग)
जर तुम्ही जिओच्या 500 रुपयांच्या आययुसी टॉपअप वाउचर खरेदी केल्यास तुम्हाला 50 जीबी 4G डेटा दिला जाणार आहे. त्याचसोबत 420.73 रुपयांचा टॉक टाईम आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 7012 मिनिट्स मिळणार आहे. तर 1 हजार रुपयांच्या आययुसी टॉपअप मध्ये 100जीबी 4G डेटा आणि 844.46 रुपयांचा टॉकटाइम दिला जाणार आहे. 14,074 नॉन-मिनिट्स सुद्धा दिले जाणार आहेत. या सर्व टॉपअप वाउचर्सची एक मुख्य गोष्ट म्हणजे हे कोणत्याही वॅलिडिटीसह येत नाहीत. कंपनीचे असे म्हणणे आहे की, हे सर्व आययुसी वाउचर अनलिमिटेड वॅलिडिटीसह येतात आणि त्यासोबत मिळणारे फ्री बेनिफिट्स सुद्धा अनलिमिटेड वॅलिडिटी काळासाठी आहे.