![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/12/Vodafone-Photo-Credit-380x214.jpg)
वोडाफोन कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी शानदार स्वस्त प्लॅन ऑफर करत आहे. सर्वात प्रथम म्हणजे या प्लॅनमध्ये देण्यात येणाऱ्या बेनिफिट्सचा अधिक फायदा युजर्सला होणार आहे. वोडाफोनने त्यांच्या 3 रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केला आहे. त्यानुसार एक 249 रुपयांचा प्लॅनचा समावेश आहे. कंपनीकडून या प्लॅनसाठी प्रत्येक दिवसाला 1.5GB डेटा दिला जात होता. मात्र आता डबल डेटा अंतर्गत 3GB डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच एकूण 28 दिवसांसाठी 84GB डेटा दिला जाणार आहे. ही ऑफर सर्व 22 टेलिकॉम सर्कल्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ही युजर्सला मिळणार आहे.
तसेच युजर्सला प्रिमीयम अॅपचे सब्सक्रिप्शन देण्यात येणार आहे. प्लॅनमध्ये वोडाफोन प्ले अॅपचे बेनिफटचा लाभ घेता येणार आहे. खरंतर वोडाफोन पे ची किंमत 499 रुपये आहे. तसेच प्लॅनमध्ये Zee5 सब्सक्रिप्शन ही दिले जाणार आहे. त्याची किंमत मात्र 999 रुपये आहे. वोडाफोनच्या 399 रुपये आणि 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दोन प्लॅनमध्ये कंपनी यापूर्वी युजर्सला 1.5GB डेटा ऑफर करत होती पण आता प्रत्येक दिवसाला 3GB डेटा देण्यात येणार आहे.(वोडाफोन-आयडिया युजर्ससाठी खुशखबर! मिळणार डबल डेटा)