वोडाफोन-आयडिया युजर्ससाठी खुशखबर! मिळणार डबल डेटा
वोडाफोन (Vodafone)- आयडिया (Idea) युजर्ससाठी एक खुशखबर आहे. कारण कंपनीने त्याच्या काही रिचार्ज प्लॅनमधील डेटा डबल केला आहे. काही प्लॅनवर प्रत्येक दिवशी 1.5GB डेटा देणे सुरु केले आहे. कंपनी आता 249 रुपये, 399 रुपये आणि 599 रुपयांच्या प्लॅनवर प्रत्येक दिवसाला 3GB डेटा देणार आहे
वोडाफोन (Vodafone)- आयडिया (Idea) युजर्ससाठी एक खुशखबर आहे. कारण कंपनीने त्याच्या काही रिचार्ज प्लॅनमधील डेटा डबल केला आहे. काही प्लॅनवर प्रत्येक दिवशी 1.5GB डेटा देणे सुरु केले आहे. कंपनी आता 249 रुपये, 399 रुपये आणि 599 रुपयांच्या प्लॅनवर प्रत्येक दिवसाला 3GB डेटा देणार आहे. या रिचार्ज प्लॅनवर यापूर्वी प्रति दिन 1.5GB डेटा दिला जात होता. 249 रुपयांच्या प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. तर 399 रुपयांच्या प्लॅनची वॅलिडिटी 56 दिवस आणि वोडाफोन आयडियाच्या 599 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांसह येतो.
कंपनीची नवी ऑफर वोडाफोन आणि आयडियाच्या प्रीपेड युजर्ससाठी आहे. यामध्ये 249 रुपये ते 599 रुपयांच्या प्लॅनसाठी डबल डेटा देण्यात येणार आहे. सर्व 22 टेलिकॉम सर्कलसाठी ही ऑफर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. युजर्सला या ऑफरचा फायदा My Vodafone, My Idea या कंपनीच्या वेबसाईटवरुन घेता येणार आहे. नव्या ऑफर नुसार युजर्सला आता प्रति दिन 3GB डेटा दिला जाणार आहे.(युजर्सकडून 1GB डेटासाठी 35 रुपये आकारण्याची वोडाफोन कंपनीची मागणी)
(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2020 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

