Reliance Jio चे बेस्ट रिचार्ज प्लॅन्स; No Limit Data चा घ्या लाभ
Reliance Jio (Photo Credits: Twitter)

टेलिकॉम कंपन्या एअरटेल (Airtel), जिओ (Jio), वीआय (Vi) आणि बीएसएनएल (BSNL) ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी नवनवे प्लॅन्स सादर करत असतात. ऑफर्स, कमी किंमत, अधिक फायदे याद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. रिलायन्स जिओने देखील काही खास प्लॅन्स सादर केले आहेत. यात डेटासाठी कोणतंही लिमिट नाही. मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांसाठी हे प्लॅन्स फायदेशीर ठरु शकतात. या प्लॅन्सची वैधता 30 ते 365 दिवस आहे. जाणून घेऊया या प्लॅन्स विषयी... (Reliance Jio चे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे खास प्लॅन्स; पहा काय आहेत ऑफर्स)

जिओचा 127 रुपयांचा प्लॅन:

जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण 12 जीबी डेटा दिला जात आहे. याची व्हॅलिडीटी 15 दिवसांची असून यात अनलिमिटेड कॉलिंगसह 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

जिओचा 247 रुपयांचा प्लॅन:

यात एकूण 25 जीबी डेटा दिला जात आहे. याची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे, यात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

जिओचा 447 रुपयांचा प्लॅन:

यात 57 जीबी डेटा मिळत असून अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. प्लॅनची व्हॅलिडीटी 60 दिवसांची असून यात JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल.

जिओचा 597 रुपयांचा प्लॅन:

यात एकूण 75 जीबी डेटा देण्यात आला आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याची व्हॅलिडीटी 90 दिवसांची आहे.

जिओचा 2,397 रुपयांचा प्लॅन:

यात एकूण 75 जीबी डेटा मिळत असून हा नो-डेली लिमिटसह देण्यात येतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधाही मिळते. याची व्हॅलिडीटी 365 दिवसांची आहे. वर्षभरासाठी कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली जात आहे. विशेषमध्ये प्लॅनमध्ये मिळणारा डेटा तुम्ही कोणत्याही लिमिटशिवाय एकाच दिवशी वापरु शकता. याशिवाय यामध्ये JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

यापैकी तुमच्या आवडीचा आणि सोयीचा डेटा तुम्ही निवडू शकता आणि नो लिमिट डेटाचा लाभ घेऊ शकता.