Reliance Jio चे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे खास प्लॅन्स; पहा काय आहेत ऑफर्स
Reliance Jio (Photo Credits: Wikimedia Commons)

रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवेनवे प्लॅन्स (Plans) सादर करत असते. आता देखील ग्राहकांच्या सोयीसाठी 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन्स सादर केले आहेत. 98, 78, 69, 39 रुपयांचे एकूण चार प्लॅन्स आहेत. याअंतर्गत ग्राहकांना बंपर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तर जाणून घेऊया काय आहेत ते प्लॅन्स आणि त्यात मिळणाऱ्या ऑफर्स.... (Reliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा)

रिलायन्स जिओचा 98 रुपयांचा प्लॅन:

98 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येत असून ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजे एकूण 21 जीबी डेटा दिला जात असून डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps इतका होतो. तसंच प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये देण्यात येत आहे.

78 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी असून दिवसाला 100MB डेटा दिला जाणार आहे. यासोबतच अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग आणि 50 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसंच यात JioTV, JioCinema आणि JioNews या अॅप्सचे सब्स्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

69 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनची व्हॅलिडिटी 14 दिवसांची असून यामध्ये तुम्हाला दर दिवसाला 500MB चा डेटा मिळणार आहे. यासोबतच अनलिमिडेट व्हाईस कॉलिंग आणि JioTV, JioCinema आणि JioNews या अॅप्सचे सब्स्क्रिप्शन देखील मिळेल.

39 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनची व्हॅलिडिटी 14 दिवसांची असून दर दिवसाला 100MB  डेटा मिळेल. तर अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग देखील मिळेल. यासोबतच  JioTV, JioCinema आणि JioNews या अॅप्सचे सब्स्क्रिप्शन देखील मिळेल.

यापैकी तुमच्या सोयीच्या प्लॅनचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर जिओचे वार्षक प्लॅन्स देखील आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचीही निवड करु शकता.