युजर्सच्या सोयीसाठी रिलायन्स जिओने एक नवा प्लॅन सादर केला आहे. हा वार्षिक प्रीपेड प्लॅन (Annual Prepaid Plan) असून सातत्याने रिचार्ज करण्याचा कंटाळा असणाऱ्या युजर्ससाठी हा प्लॅन सुयोग्य ठरेल. हा वार्षिक प्रीपेड प्लॅन घेतल्यास तुम्हाला महिन्याला केवळ 200 रुपये खर्च येईल. यासोबतच रिलायन्सने अजून एक प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यामध्ये फक्त 2 रुपये अधिक देऊन तुम्ही डबल डेटा (Double Data) मिळवू शकता. तर जाणून घेऊया या प्लॅनबद्दल.... (Reliance Jio New Plan: रिलायन्स जिओची भन्नाट ऑफर, पैसे नसतानाही ग्राहकांना करता येणार रिचार्ज)
जिओचा 2397 रुपयांचा वार्षिक प्लॅन:
जिओच्या या प्लॅनची किंमत 2397 रुपये इतकी असून या प्लॅनला 365 दिवासंची व्हॅलिडीटी आहे. हा प्लॅन घेतल्यावर युजरला अनलिमिडेट व्हाईस कॉलिंग, दिवसाला 100 एसएमएस मिळतील. तसेच या प्लॅनसोबत वर्षभरासाठी व्हॅलिड असलेला 365 जीबीचा डेटा देखील मिळेल. हा प्लॅन घेतलेल्या युजर्संना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊड या अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल.
जिओचा 2399 रुपयांचा वार्षिक प्लॅन:
जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी वर्षभराची आहे. या प्लॅन अंतर्गत युजर्सला दर दिवशी 2जीबी डेटा मिळतो. म्हणजेच युजर्सला संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण 730 जीबी डेटा मिळेल. हा प्लॅन घेतलेल्या युजर्संना वर्षभरासाठी अनलिमिडेट कॉलिंग आणि दर दिवसाला 100 एसएमएस मिळतील. त्यासोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊड या अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
या दोन्ही प्लॅनची तुलना करता युजर्संना अवघ्या 2 रुपयांत 365 जीबी अधिक डेटा मिळत आहे. या दोन्ही प्लॅनमधील फरक म्हणजे 2397 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारा 365 जीबीचा डेटा तुम्ही कधीही वापरु शकता. तर 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दिवसाला 2 जीबी डेटाचा वापरता येईल.