Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) बाजारातील अनेक टेलिकॉम कंपन्यांना टाळे लावण्याची वेळ आणली आहे. देशभरात सर्वाधिक लोक रिलायन्स जिओचे नेटवर्क वापरत आहेत. सध्या बाजरात काही ठराविक कंपन्या आहेत, ज्या जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न करित आहेत. याच पार्श्वूभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओ आणखी योजना घेऊन बाजारात उतरली आहे. त्यानुसार, ग्राहकांना पैसे नसतानाही रिचार्ज करता येणार आहे. या योजनेला 'इमरजेंसी डेटा लोन' असे नाव देण्यात आले आहे. रिसर्चनुसार, काही ग्राहकांना विविध कारणांमुळे त्वरीत रिचार्ज करता येत नसल्याने ही योजना तयार करण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

ही सुविधा अशा जिओ ग्राहकांसाठी आहे ज्यांचा दैनिक डेटा कोटा संपला आहे. परंतु, ते त्वरित डेटा रीचार्ज करू शकत नाहीत, अशा ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे, ग्राहकांना या रिचार्जचे पैसे नंतर द्यावे लागणार आहे. हे देखील वाचा-Reliance Jio, Airtel & Vi Annual Prepaid Plans: जिओ, एअरटेल आणि व्हिआय चा कोणता वार्षिक प्लॅन अधिक फायदेशीर? जाणून घ्या

या सुविधेअंतर्गत जिओ आपल्या ग्राहकांना एक जीबी (प्रत्येक) चे पाच आपत्कालीन डेटा कर्ज पॅक प्रदान करेल. प्रत्येक पॅकची किंमत 11 रुपये असेल. या आपत्कालीन डेटा कर्जाची सुविधा मायजिओ अ‍ॅपद्वारे मिळू शकते. या सुविधेमुळे ग्राहकांना एक सोपा अजून चांगला तोडगा मिळेल, असे सूत्रांनी सांगितले आहे.