भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या युजर्ससाठी एकाहून एक भन्नाट प्लान्स आणले आहेत. या प्लान्सची किंमत जास्त असल्यामुळे लोकांना जास्त दिवस वैधतेच्या प्लान्सकडे आपला कल वळवला आहे. यामुळे जिओने 84 दिवसांच्या वैधतेसह येणा-या प्लान्समध्ये आपल्या युजर्सला जबरदस्त ऑफर्स दिल्या आहेत. ज्यात अनलिमिटेड कॉलिंगसह 252GB पर्यंतचा डेटा सुद्धा दिला आहे. यात 555 रुपये, 599 रुपये, 999 रुपयांच्या प्लानस्चा समावेश आहे.
जिओच्या 599 रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला 84 दिवसासाठी 168GB चा डेटा मिळत आहे. ज्यात दरदिवसा 2GB डेटा मिळतो. यात जिओ टू जिओ कॉलिंग मोफत असून अन्य कार्डवर 3000 FUP मिनिट्स मोफत आहेत. तसेच दरदिवसा 100 SMS मोफत मिळणार आहेत.
हेदेखील वाचा- रिलायन्स Jio ने बंद केले दोन सर्वात स्वस्त रिचार्ज, जाणून घ्या अधिक
तर 555 रुपयाच्या प्लानमध्ये 84 वैधतेसह दर दिवसा 1.5GB डेटा मिळत आहे. यातही जिओ टू जिओ कॉलिंग मोफत असून अन्य कार्डवर 3000 FUP मिनिट्स मोफत आहेत. तसेच दरदिवसा 100 SMS मोफत मिळणार आहेत.
त्याचबरोबर 999 रुपयाच्या प्लानमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह दर दिवसा 3जीबी डेटा मिळत आहे. जिओ टू जिओ कॉलिंग मोफत असून अन्य कार्डवर 3000 FUP मिनिट्स मोफत आहेत. तसेच दरदिवसा 100 SMS मोफत मिळणार आहेत.
अलिकडेच जिओने नवा लॉन्ग टर्म प्लॅन सादर केला आहे. 4,999 रुपयांचा हा नवा प्लॅन असून यापूर्वी कंपनीने 2,121 रुपयांचा लॉन्ग टर्म प्लॅन सादर केला होता. 4,999 रुपयांच्या या प्लॅन अंतर्गत युजर्संना 360 दिवसांच्या व्हॅलिटीडीसह 350 जीबीचा डेटा दिला जात आहे. Fair Usage Policy (FUP)ची यात कोणतीही मर्यादा नसून युजर्स एका दिवसात हवा तितका डेटा वापरु शकतात. मात्र डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64kbps इतका असेल. 4,999रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. त्याचबरोबर जिओवरुन अन्य नेटवर्कवर कॉल केल्यास 12,000 मिनिटांचे फ्री कॉलिंग मिळेल. तसंच दररोज 100 SMS करण्याची मूभा देण्यात आली आहे. इतकंच नाही तर Jio Cinema, Jio TV यांसारख्या अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे