लॉन्चिंगनंतर सुमारे अडीच वर्षांनंतर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ठरली आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या भारती एअरटेल पेक्षा अधिक वाढली आहे. आता जिओचे तब्बल 30.6 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळे आता भारतात वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या जिओपेक्षा अधिक आहे. एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 28.4 कोटी असून वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या डिसेंबर 2018 च्या घोषणेनुसार 38.7 कोटी इतकी आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एअरटेलच्या ग्राहकांच्या संख्येची पृष्टी कंपनीच्या एका प्रवक्ताने केली आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीच्या एका विश्लेषकांनी सांगितले की, जियो ग्राहकांची संख्या अशाप्रकारेच वाढल्यास येत्या तीन महिन्यात कंपनीच्या ग्राहकांची संख्या वोडाफोन आयडियाहून अधिक होईल. (Reliance Jio GigaFiber ची स्पेशल ऑफर; केवळ 600 रुपयांत मिळेल ब्रॉडब्रँड, लँडलाईन आणि टीव्ही कॉम्बो पॅक)
जिओ ग्राहकांची संख्या सर्वाधिक गतीने वाढत आहे. तर वोडाफोन आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांनी अलिकडेच मिनिमम रिचार्ज प्लॅनची घोषणा केली होती. त्यानंतर या कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत घसरण दिसून आली. जॅपी मॉर्गन रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओने जानेवारी आणि मार्च 2019 च्या दरम्यान 2.7 कोटी नवे ग्राहक जोडले. तर 2018 मध्ये कंपनीने एकूण 12 कोटी नवे ग्राहक जोडले होते.