Redmi Watch (Photo Credits-Twitter)

शाओमीने (Xiaomi) त्यांचे नवे स्मार्टवॉच Redmi Watch लॉन्च केले आहे. हे स्मार्टवॉच सध्या चीन मध्ये लॉन्च करण्यात आले असून भारतातील लॉन्चिंग बद्दल स्पष्ट करण्यात आलेले नाही. या स्मार्टवॉचचे डिझाइन अत्यंत आकर्षक असून यामध्ये चौकोनी डायल दिली आहे. याच्या प्रमुख फिचर बद्दल बोलायचे झाल्यास रेडमी वॉचमध्ये दमदार बॅटर दिली गेली आहे. या व्यतिरिक्त स्मार्टवॉचसाठी 7 स्पोर्ट मोड्स ते कॉल-मेसेज नोटिफिकेशन फिचर्सचा सपोर्ट दिला गेला आहे.(Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी)

Redmi Watch मध्ये 1.4 इंचाचा कलर एचडी डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 320X320 पिक्सल आहे. त्याचसोबत स्क्रिन प्रोटेक्शनसाठी 2.5D ग्लास दिला आहे. तसेच वॉचमध्ये 7 स्पोर्ट्स मोड्स मिळाले आहेत. ज्यामध्ये रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंग सारख्या अॅक्टिव्हिटींचा समावेश आहे. रेडमीचे स्मार्टवॉच युजर्सला 24 तास हार्ट रेट मॉनिटर करण्यासह झोपेपर्यंत ट्रॅक करणार आहे. त्याचसोबत स्मार्टवॉचमध्ये कॉन्टॅक्ट लैस पेमेंटसाठी NFC दिले आहे. या व्यतिरिक्त वॉचमध्ये युजर्सला 100 हून अधिक वॉच फेस मिळणार आहेत.(Lamborghini Wireless Headphone: लॅम्बोर्गिनीने लाँच केले वायरलेस हेडफोन आणि इअरफोन; एकदा चार्ज केल्यानंतर 40 तास वापरण शक्य; जाणून घ्या किंमत)

रेडमीच्या वॉचसाठी 230mAh ची बॅटरी दिली आहे. जी सेवर मोड मध्ये 12 दिवसांचा आणि डेली युसेज मध्ये 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप देणार आहे. या वॉचची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी 2 तासांचा वेळ लागतो. शाओमीने त्यांच्या या स्मार्टवॉचची किंमत 299 चीनी युआन म्हणजेच 3400 रुपये ठेवली आहे. या स्मार्टवॉचची विक्री 1 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. वॉच ब्लॅक, व्हाइट आणि नेव्ही ब्लू कलर ऑप्शनमध्ये बाजारात उतरवले आहे.