Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Xiaomi Black Friday Sale 2020 (Photo Credits: Xiaomi)

ब्लॅक फ्रायडे सेल (Black Friday Sale) सुरु झाला असून या सेलचा फायदा घेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शाओमीने (Xiaomi) वेगवेगळ्या डिस्काऊंट ऑफर्स लॉन्च केल्या आहेत. शाओमीचा ब्लॅक फ्रायडे सेल हा 29 नोव्हेंबर पर्यत सुरु राहणार आहे. या सेल अंतर्गत शाओमीचे स्मार्टफोन, हेडफोन आणि इतर अॅक्सेसरीजवर जबरदस्त ऑफर्स पाहायला मिळतील. यामध्ये Mi 10 5G, Mi Watch Revolve, Mi True Wireless Earphones 2, Redmi Note 9 Pro यांसारख्या अनेक डिव्हाईसेसवर ऑफर्स दिल्या जात आहेत. जाणून घेऊया काय आहेत या ऑफर्स...

रेडमी 9 प्राईम स्मार्टफोनवर अॅमेझॉनवर 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. या फोनचे 4GB + 128GB वेरिएंट तुम्ही केवळ 10000 रुपयांना विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे रेडमी नोट 8 आणि रेडमी नोट 8A हे स्मार्टफोन्स अनुक्रमे 11,499 आणि 6,999 रुपयांना उपलब्ध असतील. रेडमी नोट 9 प्रो च्या 4GB + 128GB वेरिएंट 14,999 रुपयांना मिळेल.

Xiaomi Black Friday Sale 2020 (Photo Credits: Xiaomi)

शाओमीचा फ्लॅगशिप फोन- Mi 10 5G चा देखील या सेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. ब्लॅक फ्रायडे सेल अंतर्गत हा फोन तुम्ही 44,999 ला घेऊ शकता. इच्छुक ग्राहक या फोनवर 10000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळवू शकतात. त्याचप्रमाणे या सेलमध्ये रेडमी 9A हा फोन 6,799  रुपयांच्या डिस्काऊंडेट किंमतीत मिळेल.

Mi 10 5G (Photo Credits: Xiaomi India)

स्मार्टफोन्स व्यतिरिक्त इतर अॅक्सेसरीजवर देखील आकर्षक ऑफर्स ठेवल्या आहेत. रेडमी पॉवर बँक केवळ 699 रुपयाला उपलब्ध आहे.  Redmi Earbuds 2C आणि Redmi Earbuds S हे अनुक्रमे 1,299 आणि 1,699  रुपयांना उपलब्ध असेल. यासोबत Mi चे True Wireless Earphones 2 या वर आकर्षक डिस्काऊंट देत 2,999 रुपयांना उपलब्ध आहेत. त्यासोबतच Mi Watch Revolve या 15,999 रुपयांच्या स्मार्टवॉचवर डिस्काऊंट देत 9,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.