Realme U1: सेल्फी काढण्याची आवड जोपासण्यासाठी खास स्मार्टफोन ; २५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि बरंच काही, पाहा फिचर्स
Realme U1 (Photo Credits: www.realme.com)

भारतात नव्याने उदयाला येत असलेल्या स्मार्ट फोन ब्रँड मध्ये आघाडीवर असलेल्या रिअल मी ने रिअल मी यू वन (Realme U1 ) हा नवा खास सेल्फी काढण्यासाठी उपयुक्त स्मार्टफोन बाजारात सादर केला आहे. रिअल मी यू वन हा AI master MediaTeK Helio P70 या प्रोसेसरची क्षमता असलेला जगातला पहिला स्मार्टफोन आहे. रिअल मी यू वन तीन जी बी RAM आणि 32 जी बी ROM ( रु. 11,999/-) तसेच 4 जी बी RAM आणि 64 जी बी ROM (रु. 14,499/- ) अशा दोन प्रकारांत उपलब्ध असून ग्राहकांना फायरी गोल्ड, अँबिशस ब्लॅक आणि ब्रेव्ह ब्लू अशा तीन रंगांमधून निवड करता येईल. डिव्हाइस केवळ 5 डिसेंबरपासून 12.00 वाजता Amazon.in वर उपलब्ध असेल. सांगितले जात आहे की, हा फोन 11,999 / - ते 14,499 / - या रेंजमध्ये उपलब्ध असेन.

भारतीय ग्राहकांची सेल्फी काढण्याची आवड लक्षात घेउन या फोन ला 25 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सोनी चा IMX 576 हा ताकदवान सेन्सर या स्मार्टफोनमध्ये आहे. त्याचा 6.3 इंची ड्यू ड्रॉप स्क्रीन हेही एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अँबिशस ब्लॅक आणि ब्रेव्ह ब्लू या रंगाचे फोन येत्या ५ डिसेंबर दुपारी पासून फक्त अमेझॉन वर उपलब्ध होतील. फायरी गोल्ड रंगातला फोन २०१९ च्या सुरुवातीला उपलब्ध होईल. Realme U1 हा स्मार्टफोन भारतातील सर्वात शक्तिशाली सेल्फी केंद्रित फोन आहे. या फोनमध्ये 3 जीबी रॅम + 32 जीबी रॉमसह 11,999 / - आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी रॅम आहे. (हेही वाचा, रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन: कुणाचा डेटा पॅक अधिक स्वस्त? घ्या जाणून)

रिअल मी इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी  माधव शाह स्मार्टफोनबद्दल बोलताना म्हणाले, “रिअल मी च्या चाहत्यांसाठी रिअल मी यू वन हा XK श्रेणीतला सर्वात ताकदवान फोन सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. काऊंटरपॉईंट संस्थेच्या अहवालानुसार ऑक्टोबर -नोव्हेंबर कालावधीत आमचा बाजारपेठेत तिसरा क्रमांक लागतो. रिअल मी यू वन मुळे आता आम्हाला ‘बजेट’ ग्राहकांप्रमाणे मध्यम किंमतीच्या टप्प्यात एक उत्तम फोन ग्राहकांना देता येईल.