Reliance Jio Vs Airtel Vs Voda: रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन: कुणाचा डेटा पॅक अधिक स्वस्त? घ्या जाणून
डेटापॅकवरुन टेलिकॉम कंपन्यात स्पर्धा (Archived, edited and representative images)

Reliance Jio Vs Airtel Vs Vodafone Best budget data pack: टेलीकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ (Reliance Jio)ने एन्ट्री घेतली आणि पारंपरीक टेलीकॉम कंपन्यांना चांगलाच दणका बसला. व्यावासायिक स्पर्धेमुळे फोन कॉल आणि डेटा पॅकचे दर कमालीचे कमी झाले. परिणामी ग्राहकांची चंगळ आणि स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपन्यांची चांदी झाली. रिलायन्स जिओने ग्राहकांना अत्यंत कमी दरात डेटा उपलब्ध करुन दिला. त्यामुळे एअरटेल (Airtel)आणि वोडाफोन (Vodafone) तसेच, टेलिकॉम क्षेत्रात कार्यरत असलेल्या इतरही छोट्यामोठ्या कंपन्यांना डेटा पॅकचे दर कमी करावे लागले. इतके की, ज्या किमतीत पूर्ण महिनाभरासाठी 1GB डेटा मिळायचा त्याऐवजी तेवढ्याच किमतीत प्रतिदिन डेटा मिळू लागला. आता तर स्पर्धा इतकी प्रचंड वाढली आहे की, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याकडे अगदी स्वस्तातले विविध डेटा पॅक (Data Pack)उपलब्ध आहेत. म्हणूनच जाणून घ्या कोणती कंपनी तुम्हाला देतीय तुमच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत भरपूर डेटा.

सद्यास्थितीत तुम्ही ज्या टेडा प्लान बाबत विचार करता तो २८ दिवसांसाठीच असतो. इथे आम्ही आपल्याला रिलायन्स जिओ(Reliance Jio), एअरटेल (Airtel)आणि वोडाफोन (Vodafone) या तिन्ही कंपन्यांच्या बेस्ट बजेट प्रीपेड पॅकबाबत सांगत आहोत. ज्या पॅकमध्ये आपल्याला मिळू शकतात उत्कृष्ट इंटरनेट स्पीडसह व्हॉईस कॉलिंग आणि इतर अनेक सेवा.

रिलायन्स जिओचा 198 रुपयांवाला प्लान

Reliance Jio च्या 198 रूपये किंमतीच्या प्रीपेड प्लॅनमध्ये आपल्याला प्रतिदिन 2GBडेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांसाठी आहे. या प्लॅनमध्ये रिचार्च केल्यावर आपल्याला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, प्रतिदिन 100 एसएमएस आणि जिओ अॅपकडून मोफत सब्सक्रिप्शन यांसारखी ऑफर मिळते. जिओकडे 98 रुपयांचाही प्लॅन आहे. ज्यात प्रतिदिन 2GB डेटा प्रतिदिन मिळतो.

एअरटेलचा 149 रुपयांचा प्लॅन

एअरटेलकडेही (Airtel)आपल्यासाठी खूप सारे प्लॅन उपलब्ध आहेत. ज्यात तुम्हाल मोठ्या प्रमाणावर इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. पण, बेस्ट बजेट पॅकबाबत बोलायचे तर, एअरटेलच्या 149 रुपयांच्या पॅकमध्ये 2GB डेटा प्रतिदिन उपलब्ध आहे. या पॅकची वैधता 28 दिवसांसाठी आहे. या पॅकमध्येही आपल्याला अनलिमिटेड कॉल, मोफत रोमींग आणि 100 एसएमएस प्रतिदिन अशा सुविधा आहेत. (हेही वचा, Public Wi-Fi वापरण्यापूर्वी सुरक्षिततेच्या 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा !)

वोडाफोनचा 255रुपयांचा प्लॅन

जर आपण वोडाफोन (Vodafone) ग्राहक असाल तर, आपल्याला आपला खिसा काहीसा सैल सोडावा लागेल. वोडाफोनजवळ 255 रुपायांचा पॅक आहे. ज्याची वैधता 28 दिवसांची आहे. या पॅकमध्ये आपल्याला 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस प्रतिदिन मिळतात.