Realme Pad चा आजपासून पहिला ऑनलाईन सेल; पहा काय आहेत फिचर्स आणि किंमत
Realme Pad (Photo Credits: Realme)

Realme Pad चा आज भारतात पहिला ऑनलाईन सेल आहे. मागील आठवड्यात हा टॅबलेट Realme 8s 5G आणि Realme 8i स्मार्टफोन्ससोबत लॉन्च करण्यात आला. पहिल्यांदाच हा स्मार्टफोन देशभरात उपलब्ध होत आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर हा टॅब खरेदीसाठी उपलब्ध असेल. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट ईएमआय वरुन खरेदी केल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल. तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड्सवरुन खरेदी केल्यास 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल.

यामध्ये 10.4 इंचाचा WUXGA+ डिस्प्ले 2000x1200 पिक्सल रिजोल्यूशन सह देण्यात आला आहे. यात MediaTek Helio G80 SoC चा प्रोसेसर 4GB रॅम +64GB स्टोरेजसह देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी 8MP चा रियल आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्ट कनेक्ट फिचरमुळे युजर्स रियलमी बँड किंवा रियलमी वॉच टॅबलेटला अगदी पटकन कनेक्ट करु शकतात. कनेक्टीव्हीटीसाठी यात Bluetooth v5.0, a USB Type-C port, 4G, Wi-Fi 802.11ac आणि GPS/A-GPS देण्यात आला आहे.

Realme Pad (Photo Credits: Realme)
Realme Pad (Photo Credits: Realme)
Realme Pad (Photo Credits: Realme)

Realme Pad ची किंमत 13,999 रुपये असून 4G + Wi-Fi मॉडलची किंमत 15,999 रुपये तर 3GB+32GB वेरिएंटची किंमत 15,999 रुपये तर 4GB+64GB वेरिएंटची किंमत 17999 रुपये इतकी आहे.