चायनीज स्मार्टफोन कंपनी (Chinese Smartphone Maker) रियलमी चा नारझो 30 व्हॅनिला (Realme Narzo 30 Vanilla) मॉडल लवकरच लॉन्च होणार आहे. 18 मे 2021 रोजी हा स्मार्टफोन मलेशिया येते लॉन्च होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने नारझो 30 सिरीज भारतात लॉन्च केली होती. त्यात Narzo 30 आणि Narzo 30 Pro या स्मार्टफोनचा समावेश होता. दरम्यान, नारझो 30 लॉन्च होण्यापूर्वी युट्युबबर 'Mark Yeo Tech Review' ने या स्मार्टफोनचा अनबॉक्सिंग व्हिडिओ शेअर करत युट्युब चॅनलचे स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेत.
या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+एलसीडी डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह दिला आहे. स्मार्टफोनमध्ये octa-core MediaTek Helio G95 प्रोसेसर दिला असून 6GB रॅम दिली आहे. फोटोग्राफीसाठी मोबाईलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 48MP मेन कॅमेरा, 2MP माक्रो स्नॅपर आणि 2MP ची B&W ची लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. (Redmi Note 10S स्मार्टफोन 'या' दिवशी होणार लॉन्च, कंपनीने केला खुलासा)
नारझो 30 मध्ये 5000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्गिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात USB Type-C port, 3.5mm audio jack, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आणि फिंगरप्रींट सेन्सर दिला आहे. दरम्यान, यापलीकडे या स्मार्टफोनबद्दल इतर माहिती खुली करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर स्मार्टफोनच्या किंमतीचा देखील अंदाज बांधण्यात आलेला नाही.