Realme C25Y (Photo Credits: Realme)

Realme C25Y हा बजेट स्मार्टफोन अलिकडेच भारतात लॉन्च झाला. आजपासून या स्मार्टफोनच्या प्री-बुकिंगला (Pre-Booking) सुरुवात होणार आहे. त्यामुळे इच्छुक ग्राहक आज दुपारी 12 वाजल्यापासून स्मार्टफोन प्री-बुक करु शकतात. रियलमीच्या बजेट सी सिरीजमध्ये रियलमी सी-25, रियलमी सी-25 एस नंतर आता रियलमी सी25 देखील लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल 27 सप्टेंबर रोजी असणार आहे. (Realme C25Y: रिअलमीचा नवीन स्मार्टफोन Realme C25Y केला लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत)

हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे- 4GB+64GB आणि 4GB+128GB. याची किंमत अनुक्रमे 10,999 रुपये आणि 11.999 रुपये इतीक आहे. या स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे- Glacier Blue आणि Metal Grey.

Realme C25Y (Photo Credits: Realme)
Realme C25Y (Photo Credits: Flipkart)

Realme C25Y मध्ये 6.5 इंचाचा एचडी+डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह देण्यात आला आहे. याचे रिजोल्यूशन 720x1600 इतके असून स्क्रीन टू बॉडी रेशो 88.7 टक्के इतका आहे.

या मोबाईलमध्ये Unisoc T610 SoC प्रोसेसर सह Mali-G52 GPU देण्यात आला आहे. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे. इंटरनल मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

हा स्मार्टफोन अॅनरॉईड 11 वर आधारित Realme UI 2.0 वर कार्यरत आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यात 50MP चा प्रायमरी आणि 2MP चा स्नॅपर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 5000 mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.