Poco M4 Pro 5G लॉन्च, जाणून घ्या स्मार्टफोनच्या धमाकेदार फिचर्ससह किंमत
Poco M4 Pro 5G (Photo Credits-Twitter)

पोको एम 4 प्रो 5 जी स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. फोन तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोन तीन कलर ऑप्शन ब्लॅक, कूल ब्लू आणि पोको यल्लो मध्ये येणार आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल 22 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे.

तर पोकोच्या या नव्या स्मार्टफोनसाठी 4 GB + 64 GB - 14,999 रुपये, 6 GB + 128 GB - 16,999 रुपये आणि 8 GB +128 GB - 18,999 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा दिला गेला आहे. तसेच 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा सुद्धा मिळणार आहे. फोन लवकरच MIUI 13 अपडेट दिले गेले आहे.(अवघ्या 26 हजारांमध्ये Apple iPhone 12 Mini खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर बद्दल अधिक)

पोको एम4 प्रो 5जी स्मार्टफोन 15 हजार रुपयांच्या कमी किंमतीतील पॉवरफुल 5जी स्मार्टफोन आहे. तसेच फोनमध्ये ड्युल 5जी सिमकार्डसह 6nm प्रोसेस्ड ऑक्टाकोर MediaTek Dimensity 810 चिपसेट सपोर्टसह येणार आहे. फोनला mali G57 चा सपोर्ट दिला गेला आहे. फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले गेला आहे. तसेच स्क्रिनचा रिफ्रेस्ड रेट 90Hz दिला आहे. तर फोनचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz  असणार आहे. फोन UFS2.2 स्टोरेज सपोर्टसह येणार आहे. फोनमध्ये टर्बो रॅम सपोर्ट ही मिळणार आहे. फोनच्या स्पेसला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येणार आहे. फोनमध्ये DCI-P3 वाइड कलर Gaut आणि OG डिझाइनसह येणार आहे.