Paytm ची भन्नाट ऑफर; केवळ 9 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर
Paytm & LPG Cylinder (Photo Credits: File Image)

गॅस सिलेंडर (Gas Cylinder) महागल्याने त्रस्त आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. पेटीएम (Paytm) ने युजर्ससाठी भन्नाट ऑफर सादर केली आहे. पेटीएम अॅपवरुन गॅस सिलेंडरचे बुकींग केल्यास तुम्हाला तब्बल 800 रुपयांची सूट मिळू शकते. त्यामुळे गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला केवळ 9 रुपये मोजावे लागणार आहेत. पेटीएमने अलिकडेच ही कॅशबॅक ऑफर (Cashback Offer) सुरु केली असून 31 मे पर्यंत युजर्स याचा लाभ घेऊ शकतात. (Paytm Launches Personal Loan Service: पेटीएम अवघ्या काही मिनिटांत देणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज, लॉन्च केली पर्सनल लोन सर्विस)

पेटीएमद्वारे पहिल्यांदाच एलपीजी सिलेंडर बुक करणाऱ्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. पेटीएमवरुन गॅस सिलेंडर बुक केल्यास ग्राहकांना एक स्क्रॅच कार्ड दिले जाईल. त्यात 800 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. मात्र पेटीएमवरुन किमान 500 रुपयांचे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळू शकेल. विशेष म्हणजे पेटीएमवरुन पहिल्यांदाच एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणाऱ्यांसाठी ही ऑफर आपोआप लागू होईल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक स्क्रॅच कार्ड मिळेल. ते 7 दिवसांच्या आत उघडावे लागेल. अन्यथा ते इनव्हॅलिड ठरेल. यात 10 ते 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी काय करावे?

सर्वप्रथम पेटीएम अॅप डाऊनलोड करा. तुमच्या गॅस एजन्सीमधून सिलेंडर बुक करण्यासाठी अॅपमधील Show More वर जा आणि बिल भरण्यासाठी रिजार्जवर क्लिक करा. तिथे सिलेंडर बुक करण्याचा ऑप्शन असेल. गॅस प्रदाता निवडा. गॅस बुक करण्यापूर्वी FIRSTLPG प्रोमो कोड लागू करावा लागेल. त्यानंतर 24 तासांत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल.

यापूर्वीही अनेकदा पेटीएमने गॅस सिलेंडर बुकींगवर कॅशबॅक ऑफर सादर करत युजर्संची मने जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा ही नवी ऑफर सादर करण्यात आली आहे.