Telecom Subscriber In India: सेक्टर रेग्युलेटर ट्रायच्या नवीन अहवालानुसार, रिलायन्स जिओच्या नेतृत्वाखाली जून अखेरीस देशातील दूरसंचार ग्राहकांची संख्या किरकोळ वाढून सुमारे 117.38 कोटी झाली आहे. जूनमध्ये जिओ (Jio) ने 22.7 लाख, तर एअरटेलने 14 लाख नवीन ग्राहक जोडले.
देशातील दूरसंचार ग्राहकांची संख्या आता 1,173.89 दशलक्ष झाली आहे, जी मे मध्ये 1,172.57 दशलक्ष होती. BSNL, MTNL आणि Vodafone Idea (VIL) यांना या कालावधीत तोटा सहन करावा लागला असला तरी या कालावधीत मासिक वाढ 0.11 टक्के झाली आहे. (हेही वाचा - 5G Network Attack Prevention: 5G नेटवर्कवर हाय-स्पीड इंटरनेटसोबतच सायबर अटॅकचाही धोका; हे हल्ले रोखण्यासाठी सरकारने विकसित केले विशेष स्वदेशी सॉफ्टवेअर)
जून अखेरीस बीएसएनएलने 1.87 दशलक्ष, VIL 1.28 दशलक्ष आणि MTNL 1.5 दशलक्ष ग्राहक गमावले. जून महिन्यात सर्व कंपन्यांनी एकूण 3,73,602 नवीन ग्राहक जोडले आहेत. जूनमध्ये Jio ने 2,08,014, Airtel 1,34,021), V-Con Mobile Infra 13,100, Tata Teleservices 12,617 आणि Quadrant 6,540 नवीन कनेक्शन जोडले.
देशातील एकूण ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या 861.47 दशलक्ष झाली आहे. सध्या जिओचे एकूण 44.77 कोटी, एअरटेलचे 24.80 कोटी, Vi चे 12.49 कोटी, बीएसएनएलचे 2.45 कोटी आणि एट्रिया कन्व्हर्जन्सचे 21 लाख ग्राहक आहेत.