Oppo F15 Sale Today: ओप्पो F15 स्मार्टफोनचा आज सेल; खरेदी करण्यासाठी जाणून घ्या खास ऑफर्स
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Twitter)

चीनी कंपनी ओप्पोने (Oppo) आपला F15 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तुम्ही हा फोन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज या मोबाईलवर खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तुम्ही फ्लिपकार्ट तसेच अॅमेझॉनवर ऑनलाईन पद्धतीने हा ओपो F15 स्मार्टफोन खरेदी करू शकता. याशिवाय रिटेलर्सकडेही तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. ओप्पो F15 या स्मार्टफोनमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तसेच यात 48 मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची उंची 7.9 मीटर असून वजन 172 ग्राम इतके आहे. ओप्पो F15 स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 19 हजार 990 रुपये आहे. (हेही वाचा - कुरियर ट्रॅक करणे पडू शकते महागात, हॅकर्स खोटे SMS आणि E-Mail पाठवून करतायत पैशांची फसवणूक)

ओप्पो F15 वरीव ऑफर्स -

हा स्मार्टफोन 26 जानेवारीपर्यंत खरेदी केल्यास वन-टाइम स्क्रिन रिप्लेसमेंटशिवाय इतरही फायदे ऑफर्समध्ये मिळणार आहेत. विशेष म्हणजे एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक ग्राहकांना ऑफलाइन खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तसेच जिओच्या युजर्सना फोन खरेदीवर 100 टक्के अॅडिशनल डेटा बेनिफिट्स मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हीही ओप्पो F15 स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आजच खरेदी करा. त्यामुळे तुम्हाला यावर भरघोस सुट मिळेल.