OnePlus Smart TV चे प्री बुकींग अॅमेझॉन इंडियावर सुरु; कसं आणि कधी पर्यंत कराल प्री बुकींग? जाणून घ्या
OnePlus TV Series Pre-booking (Photo Credits: Amazon India)

चायनीज कंपनी वनप्लस (OnePlus) ने वनप्लसच्या नव्या टीव्ही रेंजच्या प्री बुकींगला सुरुवात केल्याची माहिती बुधवारी (24 जून) रोजी दिली आहे. वनप्लस आपल्या टीव्ही रेंजमध्ये दोन नवीन बजेट फ्रेंडली टीव्ही लॉन्च करणार असून टीव्ही लॉन्चचा ऑनलाईन इव्हेंट 2 जुलै रोजी पार पडणार आहे. या नव्या रेंजमधील टीव्हीचे प्री बुकींग (Pre Booking) करण्यासाठी या टीव्हीची एक्सडेंटेड वॉरंटी (Extended Warranty) अॅमेझॉन.इन (Amazon.in) वरुन विकत घ्यावी लागेल. या एक्सडेंटेड वॉरंटीची अॅच्युअल किंमत 3000 रुपये आहे. परंतु, अॅमेझॉन.इन वरुन ही एक्सडेंटेड वॉरंटी तुम्ही 1000 रुपयांत विकत घेऊ शकता. हे बुकींग तुम्ही 23 जून ते 2 जुलै दरम्यान करु शकता.

"हा टीव्ही अॅमेझॉन वरुन 5 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन विकत घेणाऱ्यांना ईमेलद्वारे कन्फर्मेशन देण्यात येईल." असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. वनप्लस टीव्ही विकत घेतल्यानंतर ज्या लोकांनी एक्सडेंटेड वॉरंटी विकत घेतली आहे. अशा लोकांना 1000 रुपयांचा अॅमेझॉन पे कॅशबॅक 10 ऑगस्टपर्यंत मिळेल, अशीही माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

पहा ट्विट:

ही ऑफर वनप्लसच्या ठराविक टीव्हीसाठी आणि दिलेल्या कालावधीसाठीच मर्यादीत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या नवीन वनप्लस टीव्ही मध्ये बेझेललेस डिस्प्ले, व्हायब्रेंट सिनेमॅटीक डिस्प्ले आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट आहे. कंपनीने यापूर्वी वनप्लस टीव्ही Q1 सिरीज लॉन्च केली होती आणि या सिरीजमधील टीव्हीची किंमत 69900 इतकी होती.