OnePlus Nord N10 5G आणि Nord N100 ग्लोबली लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स
OnePlus (Photo Credit - Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी वन प्लस (One Plus) यांनी त्यांचा शानदार Nord N सीरिज मधील OnePlus Nord10 5G आणि Nored N100 ब्रिटेन येथे लॉन्च केला आहे. या दोन्ही नव्या स्मार्टफोनसाठी पंच होल डिस्प्ले दिला गेला आहे. याचे डिझाइन OnePlus 8T सारखे आहे. OnePlus Nord N10 मध्ये 5G कनेक्टिव्हिटी दिली गेली आहे. तर Nord N100 4G LTE कनेक्टिव्हिटीसह येणार आहे. या व्यतिरिक्त दोन्ही नव्या डिझाइन्स मध्ये ऑक्टो कोर प्रोसेसर आणि स्ट्रिरियो स्पीकर्स दिले गेले आहेत.(Redmi Smartphones Sales: जबरदस्त ऑफर! रेडमी नोट प्रो, रेडमी नोट 9 प्रो मॅक्स, रेडमी नोट 9 या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 4 हजारांपर्यंत सूट)

कंपनीने वनप्लस नॉर्ड एन10 5जी च्या 6जीबी+128जीबी स्टोरेड मॉडेलची किंत 32 हजार रुपये आणि OnePlus Nord N100  च्या 4जीबी रॅम+ 64जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 17,300 रुपये ठेवली आहे. तर OnePlus Nord N10 5G  हा Midnight Ice रंगाच्या ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे.  तर OnePlus Nord N100 Midnight Frost shade मध्ये खरेदी करता येणार आहे. मात्र भारतात कधी लॉन्च करण्यात येणार याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

OnePlus Nord N10 5G  स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी दिली आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड आधारित  OxygenOS 10.5  वर काम करणार आहे. तसेच 6.49 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून त्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. त्याचसोबत फोनमध्ये Qualcomm Snapdragon 690 5G  प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज दिला गेला आहे. हा स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येणार आहे.

OnePlus Nord N100 मध्ये 4G कनेक्टिव्हिटी दिली असून तो अॅन्ड्रॉइडवर आधारित OxygenOS 10.5 वर काम करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा फुलएचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 60HZ आहे. त्याचसोबत स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 460 प्रोसेसर, 4GB रॅम, 64 जीबी स्टोरेज दिला गेला आहे. हा स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवला जाऊ शकतो. तसेच डिवाइसमध्ये 13MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.(Nokia 2 V Tella डुअल रियर कॅमेरा सेटअपसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत)

तसेच स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 18W फास्ट चार्जिंग फिचर सपोर्ट करणार आहे. त्याचसोबत फोनमध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले गेले आहेत.