Nokia 2 V Tella (Photo Credits-Twitter)

स्मार्टफोन मेकर कंपनी HMD Global यांनी Nokia 2 V Tella अमेरिकेत लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षात लॉन्च करण्यात आलेल्या Nokia 2V चा सक्सेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्लेसह मोठ्या आकाराचे बेजल दिले गेले आहेत. तसेच फोनध्ये गुगल असिस्टंट बटन दिले आहे. फोनला एकूण तीन कॅमेरे दिले आहेत. तर जाणून घ्या Nokia 2V Tella संदर्भातील अधिक माहिती.(Xiaomi कडून फोनच्या पॅकेजिंगमध्ये केले जाणार बदल, जाणून घ्या बॉक्समध्ये युजर्सला कोणत्या गोष्टी मिळणार)

नोकिया 2 वी टेला स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5.45 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचा रेजॉल्यूशन 1280X720 पिक्सल आहे. त्याचसोबत डिवाइसमध्ये MediaTek A22 प्रोसेसर, 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. जो मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येणार आहे.

तसेच कंपनीने Noka 2 V Tella मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये पहिला 8MP चा प्रायमरी सेंसर, दुसरा 2MP चा सेकेंडरी सेंसर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला एलइडी फ्लॅशसह 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. Nokia 2V Tella मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, LTE, ब्लूटूथ 4.2, जीपीएस/A-जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक, एफएम रेडियो आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे फिचर्स दिले आहेत. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये 3,000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 10 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. तर फोनचे वजन 180 ग्रॅम आहे.(Mi10T आणि Mi 10T Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत)

लेटेस्ट Nokia 2V Tella स्मार्टफोनची किंमत 168 डॉलर (जवळजवळ12,400 रुपये) आहे. या किंमतीत 2GB+16GB स्टोरेज वेरियंट मिळणार आहे. हा स्मार्टफोन फक्त ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च करणार याबद्दल अद्याप माहिती दिली गेलेली नाही.