Xiaomi (photo Credit: IANS/Representative Image)

अॅपल कंपनीने त्यांचा नवा iPhone 12 सीरिजच्या बॉक्समध्ये चार्जर आणि एअरफोन न  देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने याबद्दल अधिक स्पष्टीकरण देत असे म्हटले की, असे केल्यास त्यासाठी प्लास्टिकचा अतिरिक्त वापर कमी करण्यासह पर्यावरण सुद्धा सुरक्षित राहणार आहे. अॅपल कंपनीच्या या निर्णयामुळे अन्य कंपन्यांची त्यांची चेष्टी केली. पण आता लवकरत दुसरे ब्रॅंन्ड्स सुद्धा हा ड्रेन्ड फॉलो करणार असल्याची शक्यता आहे.(Fastest 5G Download Speed: जगात 5 जी नेटवर्क स्पीडच्या बाबतीत सौदी अरेबियाने मारली बाजी; 3 सेकंदात डाउनलोड होतो 1 GB चित्रपट)

अॅपलची चेष्टा करणारी कंपनी Xiaomi सुद्धा याच मार्गावर चालत असल्याचे दिसून येत आहे. खरंतर शाओमीने स्मार्टफोनची पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक 60 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने याची सुरुवात युरोपीय मार्केट पासून केली आहे. खासियत म्हणजे फोनसोबत येणारे एक्ससरिज मध्ये कोणताच बदल केला जाणार नाही आहे.(चीनमध्ये OnePlus 8T ची विक्रमी खरेदी; 1 मिनिटात 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या स्मार्टफोनची विक्री)

कंपनीने असा दावा केला आहे की, असे केल्यास प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा कमी होणार आहे. त्याचसोबत पर्यावरणाला सुद्धा फायदा होणार आहे.  शाओमीने नव्या रिटेल बॉक्सची सुरुवात त्यांचा नवा स्मार्टफोन mi10T लाइट पासून केली आहे. नव्या रिटेल बॉक्सचे पॅकेजिंग  कमीत कमी प्लास्टिक वापरुन केले जाणार आहे. तो पेपरचा तयार केला जाणार असून अनबॉक्स केल्यानंतर खराब होणार आहे. शाओमीच्या रिटेल बॉक्सच्या डिझाइनमध्ये करण्यात आलेला बदल हा तेवढ्यापूर्तीच मर्यादित आहे. मात्र युजर्सला याआधी जे प्रोडक्ट्स बॉक्समध्ये दिले जात होते तेच आता ही मिळणार आहे. जसे बॉक्समध्ये चार्जर, युएसबी टाइप सी केबल आणि टीपीयू केस दिली जाणार आहे.