OnePlus 8 5G & OnePlus 8 Pro 5G Smartphones India Sale: 15 जून रोजी दुपारी 12 पासून सेलला सुरुवात; Amazon.in आणि OnePlus.in वर करता येणार खरेदी
OnePlus 8 Pro 5G India Sale (Photo Credits: OnePlus India Twitter)

चायनीज स्मार्टफोन ब्रँड वनप्लसचा OnePlus 8 Pro 5G हा स्मार्टफोन भारतात लवकरच उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन एप्रिल महिन्यातच लॉन्च होणार होता आणि मे 29 पासून याच्या सेलला सुरुवात होणार होती. मात्र आता हा फोन बाजारात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्मार्टफोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 54999 इतकी असून 12GB RAM + 256GB या वेरिएंटची किंमत 59,999 इतकी आहे. या स्मार्टफोनचा सेल 15 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon.in आणि OnePlus.in वर सुरु होईल. (स्मार्टफोनमध्ये Storage ची समस्या उद्भवतेय? 'या' पद्धतीने वाढवा स्पेस)

"वनप्लस 8 सीरिज 5 जी चा सातत्यपूर्ण पुरवठा करण्याचे आमचे लक्ष्य आहे, पण आता उत्पादनाचा साठा स्थिर झाला आहे, त्यामुळे वनप्लस 8 सीरिज 5 जी स्मार्टफोनची मर्यादित विक्री होईल,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

OnePlus India Tweet:

 

OnePlus 8 Pro मध्ये 6.78 इंचाचा QHD आणि फ्लुईड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तसंच स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 चिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एक्स 55 5G मॉडेम-आरएफ सिस्टम आहे. यात 12GB रॅम असून 30% फास्टर मेमरी स्पीड असून इफीशियन्सी स्पीड 20% हून अधिक आहे. तर 256GB इतका इंटरनल स्टोरेज आहे.