Instagram ने आणले एक भन्नाट फीचर; एकाचवेळी अनेक अकाऊंट्स मॅनेज करणे झाले सोपे
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: unian.net)

जगात फोटोंसाठी सर्वात लोकप्रिय अॅप म्हणजे इंस्टाग्राम (Instagram). वेळोवेळी विविध फीचर्स अॅड करून ग्राहकांना आकर्षित करून घेण्यात इंस्टाग्राम यशस्वी ठरत आहे. आता अजून एक भन्नाट फीचर इंस्टाग्रामने आणले आहे. या नवीन फीचरचे नाव आहे 'regram', यामुळे तुम्ही एकाच वेळी अनेक अकाऊंट्सवर पोस्ट शेअर करू शकणार आहात. सध्या हे फीचर फक्त आयओएस (IOS) वापरकर्त्यांसाठीच असणार आहे. लवकरच ते अँड्रॉइडसाठीही उपलब्ध होईल. याआधी 2017 आणि 2018 मध्येही हे फीचर आले होते.

जे लोक सतत आपल्या ब्रँडचे प्रमोशन करत असतात, आपल्या कामासाठी विविध जाहिराती पोस्ट करत असतात, सतत कामाच्या गोष्टी लिहून त्या इंस्टावर पोस्ट करत असतात अशा लोकांसाठी या फीचरचा खूप फायदा होणार आहे. (हेही वाचा : मानसिक संतुलनासाठी Instagram चा मानवी आरोग्याला धोका?)

याआधी इंस्टाग्रामवर युजर्सना वेगवेगळ्या अकाऊंटवरून पोस्ट शेअर करायची असल्यास थर्ड पर्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागत होती किंवा मग एका एका अकाऊंटवर जाऊन पोस्ट शेअर करावी लागत असे. पण आता या नव्या फीचरमुळे मल्टिपल अकाऊंट एकाचवेळी मॅनेज करणे अधिक सोपे होणार आहे. यामध्ये तुम्ही फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करू शकता. मात्र इतरांच्या पोस्ट तुम्ही तुमच्या खात्यातून पोस्ट करू शकत नाही.