Moto G9 Power भारतात येत्या 8 डिसेंबरला होणार लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Moto G9 Power (Photo Credits-Twitter)

Moto G9 Power भारतीय बाजारात येत्या 8 डिसेंबरला अधिकृतरित्या लॉन्च केला जाणार आहे. याबद्दलचा खुलासा ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) यांनी केला असून त्यांच्या येथे तो लिस्टिंग करण्यात आला आहे. लिस्टिंगमध्ये अपकमिंग स्मार्टफोन Moto G9 Power च्या लॉन्चिंग तारखेसह याच्या फोटोंसह फिचर्स बद्दल खुलासा करण्यात आला आहे. भारतात लॉन्च होण्यापूर्वी हा स्मार्टफोन गेल्याच महिन्यात युरोपात लॉन्च करण्यात आला आहे. अशी अपेक्षा केली जात आहे की, युरोप आणि भारतात लॉन्च होणाऱ्या मॉडेलमध्ये अधिक बदल करण्यात आलेला नसणार आहे.

Moto G9 Power ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. तेथे देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 8 डिसेंबरला दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाणार आहे. मात्र स्मार्टफोन अद्याप वेबसाईटवर स्मार्टफोनच्या अधिक फिचर्सबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र हे स्पष्ट केले आहे की, उद्या म्हणजे 10 डिसेंबर संबंधित अधिक माहिती समोर येणार आहे. भारतात एक्सक्लुसिवली ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध करुन दिला जाणार आहे.(Vivo Y51 (2020) स्मार्टफोन 5000mAh च्या बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन)

Moto G9 Power गेल्याच महिन्यात युरोपात लॉन्च केला गेला आहे. त्याची किंमत EUR 199 म्हणजेच 17,500 रुपये आहे. भारतात हा स्मार्टफोन 15-20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनसाठी 6.78 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याची स्क्रिन रेज्यॉल्यूशन 1640X720 पिक्सल आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरवर काम करणार असून यामध्ये 4GBB इंटरनल स्टोरेज दिला आहे.(भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Motorola Moto G या महिन्यात होणार लाँच, 'या' दिवशी Flipkart होणार वर इव्हेंट)

पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी दिली असून 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. अॅन्ड्रॉईड 10 ओएस वर आधारित Moto G9 Power मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 64 MP चा प्रायमरी सेंसर, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेंसर दिला आहे. तर व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यामध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.