भारतात 2G, 3G आणि 4G आल्यानंतर आता 5G इंटरनेट सेवा सुद्धा धडाकेबाज एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे याआधी लाँच झालेल्या स्मार्टफोनमध्ये 5GB सेवा जोडण्यात आलेली नाही. मोबाईलला 5G चा स्पीड मिळताच हा फोनमधील इंटरनेट स्पीड (Internet Speed) सुसाट सुरु होणार यात तिळमात्र शंका नाही. मात्र यामुळे मोबाईल आणि रिचार्जचे प्लान्ससुद्धा वाढतील. अशातच मोटोरोला कंपनी भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मोटोरोला नवा 5G स्मार्टफोन Motorola Moto G लवकरच भारतात लाँच झाला. ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर याचा इव्हेंट होणार आहे.
Motorola Moto G 5G स्मार्टफोन भारतात येत्या 30 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता लाँच होईल. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत 299.99 युरो (जवळपास 26,300 रुपये) इतकी असेल. भारतात याची किंमत 25,000 रुपयांपेक्षाहबी कमी असण्याची शक्यता आहे. हा भारताती आतापर्यंतचा सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन असेल.हेदेखील वाचा- WhatsApp Disappearing Messages Feature भारतीय युजर्ससाठी उपलब्ध; Android, iOS, JioPhone वर कसे वापराल हे फिचर?
Can you grab a screenshot at the right frame?
Share it with us in the comments section below and get ready to unveil #motog5G on 30th November, 12 PM on @Flipkart! https://t.co/51UXsDsJfW pic.twitter.com/niTLi0IhOf
— Motorola India (@motorolaindia) November 27, 2020
या स्मार्टफोनच्या खास वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 6.7 इंचाची डिस्प्ले असू शकते. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G दिला गेला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने आपण ते वाढवू सुद्धा शकतो. या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा वाइड लेन्स अँगल असू शकतो. त्याशिवाय यात 2MP चा मॅक्रो लेन्ससुद्धा असू शकतो.
Motorola Moto G 5G बॅटरी बद्दल सांगायचे झाले तर, यात 5000mAh ची बॅटरी असू शकते. त्याचबरोबर यात 20W टर्बो पॉवर फास्ट चार्ज सपोर्ट दिला गेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात USB Type C पोर्ट दिला गेला आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा दिला गेला आहे.
याचबरोबर पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये Moto G9 Power हा मोटोरोलाच नवा स्मार्टफोन लाँच होणार आहे. यातही जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनविषयी जास्त माहिती मिळाली नाही.