WhatsApp Logo (Photo Credits: Pixabay)

लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने (WhatsApp)  काही दिवसांपूर्वी  Disappearing Messages या नव्या फिचरची घोषणा केली. आता हे फिचर भारतीय युजर्ससाठी देखील उपलब्ध जाले आहे. आपल्या युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवे फिचर्स अॅड करत आहे. आता नव्याने अॅड केलेल्या Disappearing Messages मुळे व्हॉट्सअॅपवरील मेसेज अवघ्या 7 दिवसांत आपोआप डिलिट होणार आहेत. परंतु, त्यासाठी हे फिचर अनबेल करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे मेसेज डिलिट होण्यासाठी कंपनीकडून लवकरच टाईम सेट करण्याचा ऑप्शन देण्यात येईल. (WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅप मध्ये 7 दिवसानंतर आपोआप डिलीट होणार पाठवलेले मेसेजेस, जाणून घ्या काय आहे हे Disappearing Messages फिचर)

व्हॉट्सअॅपचे हे फिचर अॅनरॉईड (Android), आयओएस (iOS), वेब आणि KaiOS (JioPhone) युजर्ससाठी उपलब्ध आहे. एखाद्या व्यक्तीसाठी Disappearing Messages फिचर अनेबल केल्यास त्या व्यक्तीने पाठवलेले सर्व मेसेजेस अगदी मीडिया फाईल्स, फोटो, ऑडिओ क्लिप्स आपोआप डिलिट होतील. चॅटच्या बाहेरुन किंवा डिव्हाईसमध्ये जिथे मेसेज स्टोअर होतात, तेथून ते डिसअपियर होणार नाहीत. तसंच Disappearing Messages फिचर सुरु करण्यापूर्वी पाठवलेले आणि आलेले मेसेजेसवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. जाणून घेऊया, हे फिचर नेमके कसे वापरायचे?

WhatsApp Disappearing Messages अॅनरॉईड आणि आयओएस वर कसे सुरु कराल?

# सर्वप्रथम तुम्हाला WhatsApp Messenger ओपन करावे लागेल. त्यानंतर ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला हे फिचर सुरु करायचे आहे. त्या व्यक्तीच्या प्रोफाईलमध्ये जा.

WhatsApp Disappearing Messages Feature (File Photo)

# त्यानंतर कॉन्टॅक नेमवर टॅप करा आणि 'Disappearing Messages'या पर्यायावर जा. जर तिथे तुम्हाला हा पर्याय दिसला नाही तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअर वरुन व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल.

# फिचर ऑन करण्यासाठी त्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक prompt message येईल. त्यात मेसेजेस 7 दिवसांनंतर आपोआप डिसअपियर होतील, असे लिहिले असेल.

WhatsApp Disappearing Messages Feature (File Photo)

# Disappearing Messages हा पर्याय ऑफ करायचा असेल तर याच स्टेप्स पुन्हा फॉलो कराव्या लागतील.

KaiOS (JioPhone) वर वापरण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

# व्हॉट्सअॅप चॅट ओपन करा.

# Options वर क्लिक करुन View Contact वर जा आणि OK करा.

# Disappearing Messages वर जा आणि Edit पर्याय निवडा.

# Prompt Message आल्यावर Next वर क्लिक करा.

# On सिलेक्ट करा आणि Ok प्रेस करा.

# हे फिचर बंद करण्यासाठी Off सिलेक्ट करा आणि Ok बटणावर क्लिक करा.

'Disappearing Messages' हे फिचर युजर्ससाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. विशेष म्हणजे याच्या ऑन-ऑफची मुभा युजर्सकडे असल्याने नव्याने लॉन्च झालेले हे फिचर युजर्सच्या नक्कीच पसंतीस उतरेल.