Modi Govt Warns iPhone Users: तुमच्याकडेही आयफोन (iPhone) असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. सॅमसंगनंतर भारत सरकारने आयफोन वापरकर्त्यांसाठी सुरक्षा अलर्ट जारी (High Risk Warning) केला आहे. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियाने शुक्रवारी (15 डिसेंबर) सांगितले की, त्यांना ऍपल उत्पादनांमध्ये अनेक धोके आढळले आहेत. त्यामुळे युजर्सच्या डेटाची सुरक्षा हॅकर्सच्या निशाण्यावर आली आहे. त्यानंतर आता CERT-IN ने आयफोन वापरकर्त्यांसाठी उच्च जोखमीची चेतावणी जारी केली आहे.
याचा अर्थ आयफोन वापरकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत या अलर्टवर कारवाई करायची आहे. युजर्सनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास, हॅकर्स फोनच्या सुरक्षिततेला बायपास करू शकतात आणि डेटा ऍक्सेस करू शकतात.
CERT-IN नुसार, अॅपलच्या उत्पादनांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे हॅकर्स डिव्हाइसवर नियंत्रण प्राप्त करू शकत्तात व त्यामुळे युजर्सचा डेटा आणि माहिती चोरीला जाऊ शकते. जास्त धोका असलेल्या उत्पादनांमध्ये iOS, iPadOS, macOS, tvOS, watchOS आणि Safari Browser चा समावेश आहे. तसेच यामध्ये Android 11, 12, 13 आणि 14 वर चालणारे सॅमसंग (Samsung) स्मार्टफोनही समाविष्ट आहेत. (हेही वाचा: Government Warning For Samsung Mobile: सॅमसंग फोन वापरत असाल तर व्हा सावध; भारत सरकारने युजर्सना दिला इशारा, जाणून घ्या काय आहे प्रकरण)
CERT-In च्या मते, या धोक्यामुळे वापरकर्त्यांच्या समस्या वाढू शकतात. हा धोका ‘हाय रिस्क’ श्रेणीत ठेवण्यात आला आहे. सॅमसंग युजर्सना देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर लगेचच हा सुरक्षा सल्ला जारी करण्यात आला आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की Android 11, 12, 13, 14 वर चालणार्या सॅमसंग फोनमध्ये काही समस्या आहेत, ज्यामुळे हॅकर्स तुमच्या फोनमध्ये घुसू शकतात. हल्ले टाळण्यासाठी प्रत्येकाला आपले मोबाईल अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला.