Micromax IN Note1 स्मार्टफोन येत्या 24 नोव्हेंबरला सेलसाठी होणार उपलब्ध, जाणून घ्या किंमतीसह ऑफर बद्दल
Micromax In Note 1 (Photo Credits-Twitter)

मायक्रोमॅक्स कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Micromax IN Note1 येत्या 24 नोव्हेंबरला विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या स्मार्टफोनचा सेल फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. ग्राहकांना Microax IN Note1 वर शानदार ऑफर मिळणार आहे. प्रमुख फिचर बद्दल बोलायचे झाल्यास या हँडसेटमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. जी फास्ट चार्जिंग फिचर सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये एकूण पाच कॅमेरा सपोर्ट दिला आहे.(Poco X3 स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची शानदार संधी, ग्राहकांना मिळणार दमदार ऑफर्स)

Micromax IN Note 1 स्मार्टफोनच्या 4GB रॅम 64GB स्टोरेज वेरियंटची फ्लिपकार्टवर किंमत 10,999 रुपये दिली आहे. ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास फेडरल बँकेकडून डेबिट कार्ड होल्डर्सला 10 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. तर एक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड होल्डर्सला 5 टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त मायक्रोमॅक्स इन नोट1 स्मार्टफोन 1223 रुपयांच्या नो कॉस्ट EMI सह खरेदी सुद्धा करता येणार आहे.(Samsung Galaxy M12 स्मार्टफोन लवकरचं होणार लाँच; 7000mAh बॅटरीसह असणार 'हे' जबरदस्त फिचर्स)

स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 बेस्ड स्टॉक वर्जनवर काम करणार आहे. अन्य फिचर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 48MP ची प्रायमरी लेंन्स, 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेंन्स, 2MP मॅक्रो आणि डेप्थ सेंसर दिला आहे. त्याचसोबत या हँडसेटच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा ही दिला आहे. मायक्रोमॅक्स इन नोट1 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा पंच होल प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनच्या उत्तम परफॉर्मेन्ससाठी MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला आहे. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, जीपीएस, ब्लुटुथ आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे फिचर्स दिले आहेत.