Poco X3 स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची शानदार संधी, ग्राहकांना मिळणार दमदार ऑफर्स
Poco (Photo Credit - Facebook)

जर तुम्ही तुमच्यासाठी एक नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण Poco X3  हा स्मार्टफोन तुमच्या बजेट मध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. पोको कंपनीचा स्मार्टफोन युजर्ससाठी ई-कॉमर्स बेवसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) शानदार ऑफर्स आणि डिल्ससह उपलब्ध करुन दिला आहे. फिचरबद्दल थोडक्यात बोलायचे झाल्यास यामध्ये 6000mAh ची बॅटरी दिली असून जी फास्ट चार्जिंग सपोर्ट लैस आहे. तसेच यामध्ये एकूण पाच कॅमेरे दिले गेले आहेत. (Redmi Note 9 5G सिरीज 26 नोव्हेंबर रोजी होणार लॉन्च; जाणून घ्या फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत)

Poco X3  स्मार्टफोनचा 6GB रॅम+64GB स्टोरेज, 6GB रॅम+128GB स्टोरेज आणि 8GB रॅम+128GB स्टोरेज वेरियंट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. याच्या किंमती क्रमश: 16,999 रुपये, 18,999 रुपये आणि 19,999 रुपये आहे. हा फोन युजर्सला Shadow Gray आणि Cobalt Blue रंगात खरेदी करता येणार आहे. ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास Axis  बँकेकडून क्रेडिट कार्ड होल्डर्सला 5 टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे.  त्याचसोबत हा स्मार्टफोन  2056 रुपये प्रति महिना No Cost EMI वर सुद्धा खरेदी करता येणार आहे.(Google Map चे नवे अपडेट, ट्रेन-बस आणि सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीचे मिळणार Live Updates)

पोको एक्स3 स्मार्टफोन 6.67 इंचाच्या फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येणार आहे. हा फोन गेमिंगसाठी Snapdragon 732G प्रोसेसवर काम करणार आहे. या व्यतिरिक्त या डिवाइससाठी अॅन्ड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिम सपोर्ट दिला गेला आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने पोक्सो एक्स3 स्मार्टफोनसाठी 64MP चा Sony IMX 682 सेंसर, 13MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2MP चा टेलिमायक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेंसर दिला आहे. त्याचसोबत  सेल्फीसाठी फोनमध्ये 20MP कॅमेरा मिळणार आहे.